Asaduddin Owaisi Akola Speech : अकोला शहरात आज एआयएमआयएमचे (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांजी जाहीर सभा पार पडली. यावेळी ओवैसींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली. यावेळी ओवैसी म्हणाले, "मुंबई बॉम्बस्फोटात यूएपीएचा कायदा, मकोकाचा कायदा काँग्रेसने बनवलेला कायदा..आणि तुम्ही आज बोलत आहात की, मस्जिद संपवून टाकू. कोणीच संपणार नाही. कोण असेल तर परमेश्वराच्या हुकमाने होईल.तुम्ही कायदा बनवला होता ना..लोकसभेच्या वेबसाईटवर जा. चिदंबरम, यूएपीए, ओवैसीचं भाषण पाहा. एक एक गोष्ट तुमच्या समोर येईल, कोणाला पकडलं तर 180 दिवस तुम्ही जेलमध्ये राहता. आज तोच कायदा भाजप वापरत आहे.2019 मध्ये अमित शाहांनी या कायद्याला आणखी खराब केलं.संसदेत मी आणि इम्तियाज जलील यांनी आवाज उठवला, असं विधान ओवैसी यांनी अकोल्याच्या सभेत केलं.
"भारतावर प्रेम करण्यासाठी...", ओवैसी काय म्हणाले?
ओवैसी त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले, "मला शिव्या देण्याआधी कधीतरी हे ऐकायचं, कोण होता ज्याने संपूर्ण संसदेत उभं राहून हे म्हटलं की, 24 जानेवारी 1950 ला बाबासाहेबांचा बनवलेलं संविधान आम्ही देशाला दिलं. तेव्हा बाबासाहेबांनी संविधानाला 'वी द पीपल'असं म्हटलं होतं. भारत मातेच्या नावाने सुरु केलं नव्हतं. हे मी संसदेत म्हटलं होतं. मी संसदेत म्हटलं की, बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. मी माझ्या मातेवर खूप प्रेम करतो. पण माझी माता माझ्यासाठी परमेश्वर नाही. मी म्हटलं की, आम्हाला जमिनीशी प्रेम आहे. भारतावर प्रेम करण्यासाठी माझी नैतिकता कमी पडत नाही".
नक्की वाचा >> आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत:लाही संपवलं! सासूनेही केलं भयंकर, CA जावयाने असं काय केलं?
"...काँग्रेस पक्षाने मत देऊन समर्थन केलं"
"मी मरायला तयार आहे. पण पाठ दाखवून पळणाऱ्यांपैकी नाही.त्यावेळी अमित शहांनी आणलेल्या कायद्याचं काँग्रेस पक्षाने मत देऊन समर्थन केलं. मी आणि इम्तियाज जलील याविषयी बोललो आणि तुम्ही माझ्यावर बोट दाखवत आहात.सीएएचा कायदा आला तेव्हा फाडून टाकला हा कायदा. तेव्हा मी म्हटलं हे बाबासाहेबांच्या संविधानाविरोधात आहे. हे स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. हे मुस्लीमांच्या विरोधात आहे. या कायद्याला फाडून संसदेच्या फ्लोअरवर फेकलं. तुमचे काँग्रेस पक्षाचे लोक काय करत होते?", असा सवालही ओवैसींनी यावेळी उपस्थित केला.