- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची जबाबदारी खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता
- शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाचे नेतृत्व येण्याची संधी असून पक्षाचे एकत्रीकरण शक्य आहे
- छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातील महत्त्वाची भूमिका आणि नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी आपली वेगळी वाटचाल केली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष चिन्ह ही मिळाले होते. पक्षावर त्यांची एकहाती पकड होती. त्यांच्या ताकदी ऐवढा एकही नेता सध्या तरी पक्षात नाही. अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा असं साधं सरळ गणीत बनलं होतं. पण आता त्यांच्या निधनानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात पाच शक्यता वर्तवल्या जात आहे. त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत.
1) राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार सांभाळणार?
सध्याच्या स्थितीत अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खासदार असलेल्या सुनेत्रा पवार सांभाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार या प्रत्येक गोष्टीत अजित पवारांसोबत राहील्या आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणाचा आणि अजित पवारांच्या राजकारणाचा अनुभव आहे. शिवाय पवार घराण्यातीलच व्यक्ती असल्याने त्यांच्यामुळे पक्ष एकसंध ठेवण्यास मदत होईल. शिवाय पक्ष दुसऱ्या कुणाच्या हातात जावू नये याची ही काळजी त्या घेतली. त्यात त्यांची पार्थ आणि जय यांची ही साथ त्यांना मिळेल. किंवा सुनेत्रा आपल्या दोन मुलां पैकी एका मुलाला पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2) शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली दुरी गेल्या काही महिन्यापासून कमी झालेली पाहीली. दोन्ही राष्ट्रवादी एक झाली पाहीजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यानुसार नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा निवडणूका राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत पुन्हा एकदा शरद पवारांना गळ घातली जावू शकते. ते पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष होवू शकतात. त्यातून दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण शक्य आहे. शरद पवार किंवा सुप्रीया सुळे पक्षाची जबाबदारी संभाळू शकतात.
3) छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचा महत्वाचा रोल
अजित पवारांनंतर पक्षात जनाधार असलेला राज्यव्यापी नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहीले जाते. ते पक्षाचे जेष्ठ नेते ही आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता म्हणून ही काम केलं आहे. त्यांना राजकारणातला दांडगा अनुभव आहे. पक्षातले ते जेष्ठ नेते ही आहेत. त्यामुळे त्यांना ही पक्षाची जबाबदारी सांभाळण्याची विनंती केली जावू शकते. किंवा भूजबळ स्वत: पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी तयार होवू शकतात. शरद पवारांनंतर पक्षात दोन नंबरचे स्थान भुजबळाना राहीले आहे. त्यामुळे ते ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात. शिवाय प्रफुल्ल पटेल यांनाही नेतृत्वाची संधी आहे.
4)अनेक नेते वेट अँण्ड वॉचची भूमीका घेणार
अजित पवारांच्या प्रेमापोटी अनेक नेते, आमदार हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत आले होते. पण अजित पवारांच्या अकाली जाण्याने त्यांच्या समोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. अशा वेळी काही नेते हे शरद पवारांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. तर काही जण भाजपकडे जातील असं ही बोललं जात आहे. काहीना काँग्रेसचा पर्याय खूला आहे. अशा स्थितीत काही नेते हे वेट अँण्ड वॉचच्या भूमीकेत असलील अशी स्थिती आहे. त्यामुळे जसा वेळ पुढे जाईल तसं राष्ट्रवादीचे नेते ही आपला निर्णय काय त्यावर विचार करतील. सध्या सर्वच जण संभ्रमात असल्याची स्थिती आहे.
5) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडणार?
या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना सुप्रिय सुळेचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे ते परत त्यांच्याकडे जाणार नाहीत. तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही असा नेता नाही जो सर्वमान्य होईल. त्यामुळे राष्ट्रवादीतच अनेक गट पडतील अशी स्थिती आहे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे असे नेते पक्षाकडे आहेत. पण त्यांचा आवाका तेवढा मोठा नाही. त्यामुळे यांचे नेतृत्व सर्वांनाच मान्य होईल असे नाही. अशा वेळी पक्षात मोठी फूट पडण्याची भीती ही भविष्यत आहे.