Ajit Pawar: अशोक खरात, अघोरी पुजा अन् अजित पवारांचा विमान अपघात! 'ते' SMS चौकशीच्या फेऱ्यात

अजित पवारांचा विमान अपघात 28 जानेवारीला सकाळी बारामती विमानतळाजवळ झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अशोक खरात प्रकरणात नव नवे खुलासे होत आहे. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. देशात अशोक खरातचीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. त्याच्याकडे मोठ-मोठे राजकारणी सतत जात होते. हे ही आता लपून राहीलेलं नाही. त्यात आता अजित पवारांचा विमान अपघात आणि अशोक खरात यांचा ही संबंध जोडला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. शिवाय नव्या वादाला ही तोंड फोडले आहे. 

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अजितदादा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच.जानेवारी महिन्यात सर्वात जास्त SMS चौकशीच्या फेऱ्यात आले. या महिन्यातील खरातचे CDR काढल्यास दादांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल असं मिटकरींनी म्हटलं आहे. त्यामुळे अशोक खरात आणि अजित पवारांचा विमान अपघात यांचा काही परस्पर संबंध आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Beed News: मस्साजोगमध्ये सरपंच पोटनिवडणूक! संतोष देशमुखांची पत्नी रिंगणात, गावकऱ्यांचा निर्णय काय?

अजित पवारांचा विमान अपघात 28 जानेवारीला सकाळी बारामती विमानतळाजवळ झाला. त्यानंतर हा अपघात की घातपात याची चर्चा ही रंगली होती. अशोक खरातमध्ये 21 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान सर्वाधिक एसएमएस संभाषण झालं आहे. त्याचा फोटो ही मिटकरी यांनी ट्वीट केला आहे. हे संभाषण काय होतं? कोणा सोबत होतं? हे चौकशीत समोर आलं तर अजित पवारांचा अपघात की घातपात हे स्पष्ट होण्यास मदत होईल असा दावाच मिटकरी यांनी केला आहे. शिवाय त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एका अघोरी पुजेचा ही उल्लेख केला आहे.

नक्की वाचा - ठाणे ते बोरिवली...! देशातील सर्वात लांब बोगदा; दीड तासांचा प्रवास 15 मिनिटात, 11 KM मार्ग कसा असेल?

विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाता आधी त्यांच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार ही समोर आला होता. या सर्व कडी आता मिटकरी जोडत आहेत. त्यातून त्यांनी अशोक खरात कनेक्शन जोडण्याचा ही प्रयत्न केला आहे. अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अपघात की घातपात याची चर्चा अजून ही थांबलेली नाही. रोज नवनवीन दावे केले जात आहेत. त्यात आता मिटकरींच्या या नव्या थिअरी नुसार काही बाहेर येणार का? हाच खरा प्रश्न आहे. सध्या बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. बरोबर त्याच वेळी मिटकरींनी ही गुगली टाकली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.