'बाबासाहेबांचे नाव घ्यायला या लोकांना इतका प्रॉब्लेम का?' विधानसभेतही खडाजंगी

नितीन राऊत यांनी या लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला प्रॉब्लेम काय आहे असा प्रश्नही उपस्थित केला.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

डॉ. बाबासाहेब आंबे़करांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. या निमित्ताने काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवाय अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेधही केला. या लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला प्रॉब्लेम काय आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जे वक्तव्य अमित शाह यांनी केले तो केवळ बाबासाहेबांचा नाही तर देशाचा, या देशातल्या दलितांचा अपमान असल्याचे राऊत विधानसभेत म्हणाले. तर राज्यसभेतली वक्तव्यावर विधानसभेत चर्चा कशी होवू शकते असा मुद्दा मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित करत राऊत यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. पण अध्यक्षांनी आपण सर्व नियम तपासून निर्णय घेवू असं स्पष्ट केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नितीन राऊत यांनी या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. बाबासाहेबांबद्दल अमित शाह यांचे वक्तव्य हे आक्षेपार्ह होतं असे राऊत म्हणाले. बाबासाहेबांचे नाव जर आम्ही घेत असू तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला ही काय प्रॉब्लेम आहे असा खडा सवाल यांनी उपस्थित केला. जे मंत्री राज्यसभेत बोलत होते ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मंत्री झाले हे विसरले का असा प्रश्नही त्यांनी केला. बाबासाहेबांबाबत येवढा राग त्यांच्या मनात का आहे. त्यांनी केवळ बाबासाहेबांचाच नाही तर संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. देशातल्या दलितांचा अपमान केला आहे. बाबासाहेब हे आमच्यासाठी इश्वर आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. असं राऊत यावेळी म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  'RSS, जनसंघाने सर्वाधिक विरोध बाबासाहेबांनाच केला' प्रकाश आंबेडकर थेट बोलले

बाबासाहेबांचा नाव ज्या पद्धतीने घेतलं जातं. आंबेडकरांचे नाव घेणं फॅशन झालं. त्यांना भगवान म्हटलं. याचा विचार झाला आहे. संबिधाना मुळे मंत्री झाले. या लोकांना नाव घ्यायला प्रॉब्लेम काय आहे येवढा द्वेश का आहे. संविधानामुळे हेशक्य ते किती नफरत करत आहे. हा बाबासाहेबांचा नाही तर देशाचा अपमान दलितांचा अपमान आहे. संविधान निर्माते आमच्यासाठी ते इश्वर आहेत. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - छगन भुजबळांचा एल्गार! अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकले; संघर्ष मेळाव्यातून मोठी घोषणा!

नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर मंत्री आशिष शेलार यांनीही आपले मत व्यक्त केले. राज्यसभेत ज्या गोष्टीची चर्चा झाली आहे त्याची चर्चा विधानसभेत होवू शकते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी मार्गदर्शन करावे असेही ते म्हणाले. जे वक्तव्य राज्यसभेत केले गेले. त्याचा पुर्ण संदर्भ दिला गेला नाही. हवं तेवढं सांगितलं गेलं. त्यात पुढे त्यांनी काँग्रेसने बाबासाहेबांचा कसा अपमान केला हेही सांगितलं आहे. त्याचा उल्लेख राऊत यांनी का केला नाही असा प्रश्न शेलार यांनी केला. त्यामुळे राऊत यांचे वक्तव्य कामकाजातून वगळावे अशी मागणी त्यांनी केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - खाते वाटपावरुन भाजपमध्ये स्पर्धा? चंद्रशेखर बावनकुळे- विखे पाटलांमध्ये रस्सीखेच, वाचा संभाव्य फॉर्म्युला

यावर नितीन राऊत हे आणखी आक्रमक झाले. हे सभागृह बाबासाहेबांनी लिहीलेल्या संविधानानुसार चालणार आहे. त्याच संविधान निर्मात्याबाबत जर कोणी उलट सुलट बोलणार असेल तर आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याबाबतचा मुद्दा आम्ही मांडणार. आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. बाबासाहेबांचा अपमान कोणत्याही स्थिती सहन केला जाणार नाही. त्यामुळे कामकाजातून कोणतेही विधान काढू नये असं ते म्हणाले. त्यावर अध्यक्षांनीही आपण आपले वक्तव्य तपासून पाहू आणि निर्णय घेवू असं स्पष्ट केलं.