डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत राज्यसभेत केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अडचणीत आले आहेत. काँग्रेसने अमित शाह यांच्या बरोबर भाजपला घेरलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याचे पडसाद उमटले. त्यांच्या बचावासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरावे लागले. असं असताना आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी भाजपला आरसा दाखवला आहे. शिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त विरोध कुणी केला असेल हे ही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. बाबासाहेबांचा अमित शाह यांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला त्याचा चांगलाच समाचार प्रकाश आंबेडकरांनी घेतला. भाजप पक्ष हा आता जन्माला आलाय. त्या आधी जनसंघ होता. आर.एस.एस.होतं. सन 1949, 1950, 1957,1958 या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात जास्तविरोध याच संघटनांनी केला. भाजपची ही जुनी मानसिकता आहे. तिच बाहेर पडली आहे. अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला फटकारलं आहे. शिवाय अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे. ती भाजपची जुनी मानसिकता आहेत. ती बाहेर पडलेली आहे. यात नवीन असं काही नाही.
तेव्हाचे प्लॅन होते. पण त्यांना ते आताही अंमलात आणता येत नाहीत. ते आमलात आणण्यात सर्वात मोठा अडसर जर कोणी असेल तर तो आंबेडकर आहेत. त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत आहे. भाजपचा तोच जळफळाट बाहेर पडला आहे असं प्रकाश आंबेडकर थेट म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू शकतात. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी भाजपची याच मुद्द्या वरून कोंडी केली आहे.
संविधाना वरिल चर्चेवेळी राज्यसभेत अमित शाह बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर करण्या पेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. बुधवारी दोन्ही सभागृहात त्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनुस्मृती मानणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्रास होणारच अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे. तर काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान कसा केला हे भाजप सांगत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world