जागा एक दावेदार दोन! बाप-लेकात रस्सीखेच, मागे कोण हटणार?

या मतदार संघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी मंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा सलील देशमुख याने दावा केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच जण तयारीला लागले आहेत. इच्छुकांनी तर मोर्चे बांधणीही सुरू केली आहे. एका मतदार संघावर अनेकांनी दावे केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोर कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच आहे. पण एक मतदार संघ असा आहे ज्यावर बाप लेकाने दावा केला आहे. तो मतदार संघ आहे काटोल. या मतदार संघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी मंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा सलील देशमुख याने दावा केला आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघातून अनिल देशमुख हे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारां ऐवजी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे गृह खातं होतं. आता विधानसभा निवडुका घोषीत होतील. या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी अनिल देशमुख यांनी केली आहे. तशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे. पण सलील देशमुखही या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यावर बोलताना त्यानेही मतदार संघात का केले आहे, त्यामुळे तो ही उमेदवारी मागू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - दादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? 'तो'आमदार कोण?

सलील देशमुख यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. सलील हे अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत. आता त्यांना विधानसभा निवडणूक लढायची आहे. विधानसभा लढण्यात आपण इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदार संघात आपले वडील अनिल देशमुख ही इच्छुक असल्याचे ते म्हणाले. शिवाय काही कार्यकर्तेही इच्छुक आहेत. तेही उमेदवारी मागू शकतात असे सलील यांनी स्पष्ट केले. उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठी घेतील असे ही त्यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार
  
सलील यांनी मतदार संघात बरीच कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांचे वडील अनिल देशमुखही ते मान्य करतात. असं असलं तरी खरा पेच पक्ष नेतृत्वा समोर आहे. शरद पवारांनी जास्तीत जास्त उमेदवारी ही तरूण चेहऱ्यांना देणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्याच्या रेसमध्ये सध्या तरी सलील हे पुढे आहेत असे चित्र आहे. पण लेकासाठी बाप थांबणार का हे पहावं लागणार आहे. 

Advertisement