फडणवीसांच्या सांगण्यावरुन वाझेनी... अनिल देशमुखांचा मोठा आरोप! 'तो' अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी

Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख या आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या वादाला आता नवं वळण आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवा आरोप केला आहे.
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख या आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या वादाला आता नवं वळण आलं आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यानं या प्रकरणात एन्ट्री घेतल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात देशमुख यांनी आज (रविवार, 4 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्र्यांवर नवीन आरोप केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले देशमुख?

देवेंद्र फडणवीस यांना दहशतवादी सचिन वाझेंचा वापर करावा लागत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तीन वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप करायल लावले.. तत्कालीन मुख्यमंत्री याना चौकशी करण्याची मागणी केली, त्यानंतर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी केली. तो अहवाल सरकारला अहवाल दिला आहे, तो अहवाल गृह विभागाकडे आहे.तो राज्य शासनाकडे असलेला 1400 पानाचा अहवाल समोर आणावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. 

सचिन वाझे यांनी न्या. चांदिवाल समोर सांगितले होते की, अनिल देशमुख यांनी किंवा त्यांच्या पी. ए. ने किंवा कोणत्याही ऑफिशियाल किंवा नॉन ऑफिशियल स्टाफने पैसे मागितले नाहीत. त्यानंतर आता तेच वाझे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून उलट बोलत आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तुरुंगातून बाहेर काढून माझ्याविरुद्ध बोलायला लावले. ते आणखी एखाद्या आरोपीला तुरुंगात काढून माझ्यावर स्टेटमेंट द्यायला लावतील, असा आरोपही देशमुख यांनी केला.

( नक्की वाचा : 'माझ्या नादी लागलात तर मी सोडत नाही', फडणवीसांचा थेट इशारा )
 

काय आहेत वाझेचे आरोप?

सचिन वाझे हा सध्या जेलमध्ये आहे. त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे गोळा करत होते. याबाबतचे पुरावे सीबीआयकडे आहेत. आपणही काही पुरावे दिले आहे. शिवाय याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून कळवलेही आहे. या प्रकरणी आपण नार्को टेस्ट  करायलाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जे पत्र आपण लिहीले आहे त्यात जयंत पाटलांचेही नाव असल्याचे वाझे म्हणाले. यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article