महिला कर्मचाऱ्यांना वर्कफॉर्म होमची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालिका विज्ञान दिनाच्या एक दिवस आधी हा निर्णय घेतला गेला आहे. या सुविधेचा फायदा आंध्रप्रदेशात होणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे. या निर्णयामुळे महिलांच्या कार्यक्षमतेला अधिक चालना मिळेल असा विश्वास चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे. कोविडमुळे काम करण्याच्या पद्धती या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्क फॉर्म होम करणे अधिक सोपे झाले आहे. त्यातून चांगले काम करता येत आहे. शिवाय त्यातून उत्पादकता ही वाढत असल्याचे ते म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. अशा निर्णयामुळे आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. शिवाय आपलं जीवनही संतुलीत बनेल. आम्ही आंध्रप्रदेशमध्ये सार्थक बदल आणणाऱ्या योजना आणत आहोत. आंध्र प्रदेश IT आणि GCC क्षेत्रात गेम चेंजिंग पाऊल उचलत असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही विकासकांना प्रत्येक शहर, तालुका, गावात आयटी कार्यालय उघडण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यातून रोजगार निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं. याचा फायदा महिलांनाही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी
महिलांना नोकरीत समान संधी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितलं. विज्ञान, इंजिनिअरिंग, उद्योग या क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. शिवाय महिलांना त्यांनी आतर्राष्ट्रीय महिला व बालिका विज्ञान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. महिलांना पुढे येण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्नशील राहील असंही चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केलं.