B.Sudarshan Reddy: सुदर्शन रेड्डी यांना विरोधकांनी उपराष्ट्रपतीचा उमेदवार का बनवले? वाचा संपूर्ण गेम प्लॅन

B. Sudershan Reddy : सत्तारुढ एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्याला उत्तर देताना विरोधकांनी मोठा डाव खेळत त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Sudershan Reddy, Opposition's Candidate For Vice President Polls : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही रंगतदार होण्याची शक्यता आहे. सत्तारुढ एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्याला उत्तर देताना विरोधकांनी मोठा डाव खेळत त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

प्रदीर्घ चर्चा आणि अनेक बैठकांनंतर विरोधकांची रणनीती यावेळी स्पष्ट दिसून येत आहे. त्यांनी राजकीय चेहरा न देता न्यायपालिकेशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. स्वच्छ प्रतिमा असल्यानं 'इंडी आघाडी'च नाही तर संपूर्ण विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळेल, असा उमेवार त्यांनी जाहीर केलाय. विरोधकांनी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी का दिलीय? हे समजून घेऊया

विरोधकांची ही रणनीती एनडीएसाठी (NDA) अडचणीची परिस्थिती निर्माण करू शकते. वास्तविक, दक्षिण भारतातून उमेदवार आणणे ही DMK ची मागणी होती, बिगर-राजकीय नाव ही TMC अपेक्षा होती. काँग्रेससह सर्व पक्षांना उमेदवार सर्वमान्य चेहरा असावा असे वाटत होते. अशा परिस्थितीत, न्यायमूर्ती रेड्डी यांच्या नावावर विरोधकांची सहमती झाली.

( नक्की वाचा : उपराष्ट्रपती निवडणूक; भाजपची चाल विरोधकांमध्ये फूट पाडणार; सी.पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचा अर्थ काय? )
 

काय आहे विरोधकांचा गेम प्लॅन?

  • बिगर-राजकीय आणि उच्च विश्वासार्हतेचा चेहरा निवडणुकीच्या मैदानात उतरवणे ही विरोधकांची रणनीती आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली.
  • ज्याप्रमाणे एनडीएने (NDA) द्रविड पक्षांना (DMK इत्यादी) संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे आता न्यायमूर्ती रेड्डी यांचे नाव आल्याने TDP, YSRCP आणि BRS यांना पाठिंबा द्यायचा की नाही याचा पुन्हा विचार करावा लागेल.
  • विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे संघाशी संबंधित चेहरा आहे, तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टाकडून आलेला चेहरा आहे.
  • दक्षिण भारतातून उमेदवार असावा अशी DMK ची मागणी होती, जी पूर्ण झाली.
  • बिगर-राजकीय चेहरा असावा अशी TMC ची मागणी होती, जी देखील बी सुदर्शन पूर्ण करतात.
  • सूत्रांनुसार, हा केवळ इंडिया ब्लॉकचा (INDIA Block) नाही, तर संपूर्ण विरोधी पक्षाचा उमेदवार असेल. AAP ने देखील या नावाला पाठिंबा दिला आहे.


 

Topics mentioned in this article