विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्या पैकीच एक म्हणजे काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरातांचा पराभव होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण मतदारांनी त्यांना पराभवाचा धक्का दिली. सलग 8 वेळा विधानसभा गाठणारे थोरात नवव्या निवडणुकीत मात्र पराभूत झाले. हा पराभव त्यांच्या अगदी जिव्हारी लागला आहे. त्यांनी ही सल बोलून दाखवली. गेल्या 40 वर्षात संगमनेरसाठी काय केलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय गेल्या 40 वर्षातल्या कामाचा पाढा त्यांनी वाचला. शिवाय आता सर्व दरूस्त करणार काळजी करू नका असा धीर ही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. यावेळी थोरात भावूक झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणुकीत पराभूत झाला याची अनेक कारणे आहेत. अनेक लोक मला येवून भेटत आहेत. प्रत्येकांनी वेगवेगळी कारणं सांगितली आहे.पण मी गाफीर राहीलो. तुम्ही गाफील राहीलात. आपण किती मताधिक्य मिळणार याचा विचार करत होतो. पण प्रत्यक्षात आपला पराभव झाला. या मतदार संघात कधी नाही ते हिंदू मुस्लिम केले गेले. मी मुस्लिम धार्जिणा असल्याचा प्रचार घराघरात झाला. भडक प्रचार केला गेला. पण माझ्या कामाची पद्धत आहे मी सर्वांना सोबत घेवून आतापर्यंत काम केलं आहे. यापुढेही हीच पद्धत राहील. संगमनेरची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या चाळीस वर्षात या तालुक्याने बरचं काही दिलं असं थोरात भावूक होवू म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
या तालुक्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. 1999 साली कॅबिनेट मंत्री झालो असतो. पण जससंपदा मंत्रालय मिळावं म्हणून राज्यमंत्री झाले. त्याच वेळी निळवंडे धराणाचं काम केलं. संगमनेरच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. या मतदार संघात शांतता निर्माण केली. महसूल, कृषी, शिक्षण यासारखी अनेक खाती सांभाळली. ज्या प्रमाणे राज्याच्या भल्यासाठी काम केलं तसचं संगमनेरसाठी काम केलं. 1985 साली राजकारणात आलो. तेव्हा पासून संगमनेरनं साथ दिली. तेव्हापासून आजपर्यंत एक राजकीय संस्कृती या शहरात निर्माण केली. राजकार आपल्या ठिकाणी ठेवलं. त्यामुळे जनतेने चाळीस वर्ष संधी दिली.
ट्रेंडिंग बातमी - 'मुंबई मारवाड्यांची,मुंबई भाजपची' मारवाड्याचा माज मनसेनं उतरवला
निकालानंतर सर्व जण काळजीत पडले आहेत. पण काळजी करू नका. सर्व काही ठिक केलं जाईल असं थोरात म्हणाले. आपण गाफील राहीलो हे मान्य करावं लागेल असंही ते म्हणाले. मी राज्यभर प्रचार करत होतो. तुम्ही इथं प्रचार केला. पण आपण कमी पडलो. हे सांगत असताना हा पराभव आपल्या जिव्हारी लागल्याचं थोरात म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं. ते आपण आतापर्यंत काय काय केलं याचा पाढा वाचत होते. संगमनेरमुळे देशात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझं नाही तर संगमनेरचच नाव झालं असंही ते यावेळी म्हणाले. पराभवानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.