मराठमोळ्या गिरगावमध्ये मराठी नाही तर आता मारवाडी बोलावं लागेल. मुंबई मारवाड्यांची, मुंबई भाजपची असं बोलत एका मारवाड्याने मोजरपणा दाखवला. त्याचा हा माज मनसेच्या कार्यकर्त्यांना 'मनसे' प्रसाद देऊन उतरवला. ही घटना खेरवाडीत घडली. यानंतर ज्या महिलेबरोबर ही घटना घडली तिने स्थानिक आमदार असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनाही याबाबतची तक्रा केली. पण त्यांनीही त्याकडे लक्ष न देता त्या महिलेवरच ते भडकल्याचे संबधित महिलेचा आरोप आहे. त्यानंतर तिने मनसे कार्यालय गाठले. मग या मुजोर मारवाड्याला मनसे कार्यकर्त्यांनी धु..धु.. धुतले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमल मस्कर या खेतवाडीत राहातात. रविवारी संध्याकाळी त्या सामान आणण्यासाठी एका मारवाड्याच्या दुकानावर गेल्या. त्यावेळी तिथे असलेल्या मुजोर मारवाड्यांने त्यांना मारवाडी बोला. आता मुंबईत भाजप आलं आहे. तुम्हाला मारवाडी बोलावं लागेल. असा दमचं भरला. पण विमल यांनी मारवाडी का बोलायचं? मराठी माणसाच्या महाराष्ट्रात मारवाडी बोलायचं का? आणि कशासाठी बोलायचं असा जाब त्यांनी त्याला विचारला. एकदा नाही तर तिन वेळा विचारलं. पण तो मारवाडी ऐकायला तयार नव्हता.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
याबाबतची तक्रार विमल यांनी स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली. पण त्यांनीही दुर्लक्ष केले. उलट ते माझ्यावरच भडकले असं विमल मस्कर सांगतात. तुम्ही भांडण लावण्याचा प्रयत्न करता असंही ते म्हणाले. ज्या लोढांना आम्ही पाठिंबा दिला त्यांनीच आम्हाला धिडकारले. आमच्यामुळे ते आमदार झाले. त्यांनी आमचे म्हणणे ऐकले पाहीजे होते. पण तसं झालं नाही. उलट मी तुम्हाला ओळखत नाही असं ही ते म्हणाले. आम्हाला न्याय पाहीजे असंही त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी मनसे कार्यालय गाठलं.
ट्रेंडिंग बातमी - महिला वाहतूक पोलिसांची तत्परता, गर्भवती महिलेची रस्त्याच्याकडेलाच केली प्रसूती
मनसे कार्यालयात पोहोचल्यावर विमल यांनी झालेली सर्व गोष्ट सांगितली. त्या मारवाड्याला मनसेच्या शाखेत आणलं गेलं. त्यानंतर तो मारवाडी आपण चुकून बोललो असं सांगत गयावया करू लागला. आपली चुक झाली. परत असं होणार नाही असं तो म्हणत होता. पण मुंबईत मारवाडी का बोलायचे असं मनसे कार्यकर्ते त्याला विचारत होते. यावर चुक झाली ऐवढेच तो बोलत होता. पण मनसैनिकांचा पारा चढला. त्यांनी या मारवाड्याला तिथेच मनसे चोप दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world