'जरांगेना आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा नाही, मुख्यमंत्री होण्याची इच्छा !' मराठा आमदाराचा हल्लाबोल

Manoj Jarange : 'मनोज जरांगेच्या टीमला यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही. जरांगेंची स्वत मुख्यमंत्री पद मिळवण्याची इच्छा आहे. त्यांचं मंत्रिमंडळ देखील तयार आहे,' असा आरोप बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

'मनोज जरांगेच्या टीमला यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही. जरांगेंची स्वत मुख्यमंत्री पद मिळवण्याची इच्छा आहे. त्यांचं मंत्रिमंडळ देखील तयार आहे,' असा आरोप बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. राज्यातील मराठा आमदारानं जरांगेंवर पहिल्यांदाच जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यापेक्षाही कठोर शब्दात राऊत यांनी जरांगेंवर टीका केली आहे. 

मराठ्यांना सरसरट आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून राज्यभरात आंदोलन करत आहेत. आंदोलन, मोर्चे, उपोषण यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा हा लढा सुरु आहे. या मागणीसाठी त्यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. इच्छूक उमेदवारांच्या भेटी, घोंगडी सभा या माध्यमातून जरांगे निवडणुकीच्या राजकारणातील एन्ट्रीची तयारी करत आहेत. त्याचवेळी NDTV मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेमध्ये  राऊत यांनी हा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मी फुंकलो असतो तरी...

राजेंद्र राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई-वडिलांची शपथ घेऊन जरांगेंसदर्भात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मी ठरवलं असतं तर उदयनराजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असते, असा जरांगेंनी दावा केला होता. मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. 

राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांची पाच वेळा भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं काय झालं त्याची माहिती त्यांनी NDTV मराठीला दिली आहे. आपल्या फोनवरुनच जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. 15 ते 20 मिनिटं ही चर्चा झाली. आपल्या मध्यस्थीनंतरच जरांगे यांची एसआयटी चौकशी थांबली, असा दावा राऊत यांनी केली. 

( नक्की वाचा : '... तर त्याच क्षणी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य )
 

मुख्यमंत्री होण्याची इच्छा

मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाच्या आमदारांची संख्या कमी होईल. त्यांना स्वत: मुख्यमंत्रीपद मिळवण्याची इच्छा आहे. त्यांचे मंत्रीमंडळ देखील तयार आहे. जरांगेंच्या टीमला मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा नाही. त्यांचा कुणावरही विश्वास नाही.  जरांगेना प्रत्येक ठिकाणी मराठा आमदारांनी मदत केली. त्यांनांच जरागेंची शिविगाळ केली. ते मराठा समाजाचे मालक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली.

Advertisement

राजेंद्र राऊत यांच्या घरासमोरच सभा घेणार असल्याचं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं होतं. ही सभा घेऊन दाखवा असं प्रती आव्हाण राऊत यांनी यावेळी दिलं. राऊत यांनी जरांगे यांना 11 प्रश्न विचारणारे होर्डिंग जागोजागी लावले आहेत.

( नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील मैदानात, बीड जिल्ह्यात कुणाची वाढवणार डोकेदुखी ? )
 

'पवारांचच घराणं तुम्हाला मुख्यमंत्री पाहीजे'

जरांगे मराठा समाजाचे मालक नाहीत. फडवीसांचं नाव घेतल की जरांगेंना का अ‍ॅलर्जी होते? असा सवाल राऊत यांनी विचारला. फडणवीस यांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. बार्शीतले खंडोजी खोपडे जरांगेंना भरवतात. मनोज जरांगे यांच्याकडं संयम नाही. तुम्ही मुख्यमंत्री, विखे-पाटील यांना शिवीगाळ करता. तुमच्यामुळे मराठा आमदारांची संख्या 100 च्या आत येईल. तुमचं मंत्रिमंडळ तयार आहे. तुम्ही पवारांना का विचारत नाही? असा सवालही राऊत यांनी विचारला. 

Advertisement

जरांगे पाटील यांचं उपोषण आपल्या मध्यस्थीमुळेच सुटलं असल्याचा दावा राऊत यांनी यावेळी बोलताना केला. एकनाथ शिंदे आणि जरांगे एकच आहेत. रिक्षावाला तुम्हाला मुख्यमंत्री तुम्हाला जमत नाही का? का पवारांचच घराणं तुम्हाला मुख्यमंत्री पाहीजे? असंही राऊत यावेळी म्हणाले. का कोणाच्या वाटेला जायच म्हणून मराठा आमदार गप्प बसतात. माझं डोक बिघडवू नका नाहीतर मी तुमचं धडा शिकवेन, असा इशाराही राऊत यांनी दिला. 

Topics mentioned in this article