जाहिरात

'... तर त्याच क्षणी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis on Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'... तर त्याच क्षणी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
मुंबई:

Devendra Fadnavis on Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं लक्ष्य केलंय.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे, पण फडणवीसांनी ते थांबवलं आहे. फडणवीस हे जाणून बुजून आरक्षण मिळवू देत नाहीत. त्याची फळं त्यांना भोगावी लागतील, अशी टीका जरांगे यांनी केली होती. या टिकेला उत्तर देताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का निवृत्त होणार फडणवीस?

मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, याची मला कल्पना आहे. पण, राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं, असं आव्हान फडणवीसांनी दिलं.

 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन,' असं मोठं वक्तव्य फडणवीस यांनी जरांगे यांना उद्देशून केलं आहे. 

( नक्की वाचा : जरांगे पाटलांकडून सतत होत असलेल्या हल्ल्यावर फडणवीसांनी सोडलं मौन! )
 

आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. या पद्धतीनं जाणीपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, त्यांना मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यामध्ये मी अडथळा आणला, मी निर्णय होऊ दिला नाही, तर त्याच क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणामधूनही सन्यास घेईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : 'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप )
 

जरांगे मलाच लक्ष्य का करतात ?

मनोज जरांगे पाटील नेहमी मलाच लक्ष्य का करतात? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात विचारला होता. 'मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात युतीची सरकार आहे, तरीही मनोज जरांगे पाटील रोज फक्त मला का लक्ष्य करतात? हा प्रश्न कोणी त्यांना विचारणार आहे का?' असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com