स्वानंद पाटील, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी धक्कादायक आहेत. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला. लोकसभेत 8 जागा जिंकणाऱ्या या पक्षाला विधानसभेत फक्त 10 जागांवर विजय मिळाला. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बजरंग सोनावणे यांनी विजय मिळवला होता. पण, विधानसभेत पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली. शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातही पक्षाचा नामुश्कीदायक पराभव झाला. या पराभवानंतर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची जीभ घसरली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बजरंग सोनावणे यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान स्थानिक पत्रकारवर पातळी सोडून टीका व्यक्त केली. विधानसभा निकालानंतर त्या पत्रकाराने बजरंग सोनावणेवर शंका व्यक्त केली होती. त्यावर हा संशय कुणाला आला? तुझ्या बायकोला आला की पोराला आला असं वक्तव्य केलं. आपण केजमध्ये फॉर्म भरायला नव्हतो म्हणून त्या पत्रकाराला संशय आला पण, माझा मुलगा तिथं होता हे दिसलं नाही, असं सोनावणे म्हणाले. सर्व पत्रकार सत्तेच्या बाजूने आहेत, असं सांगत सोनावणे यांनी माध्यमांनी सत्य लिहावं असा सल्लाही यावेळी दिला.
( नक्की वाचा : एक सस्पेन्स संपला : राज्याच्या मुख्यमंत्र्याआधी उपमुख्यमंत्री ठरला ! तटकरेंचे स्पष्ट संकेत )
बजरंग सोनावणे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी यापूर्वी देखील चर्चेत आले होते. यापूर्वी त्यांनी रस्त्याची मागणी करायला गेलेल्या एका नागरिकाला रस्ता करणे हे खासदाराचे काम नाही तर पालकमंत्र्याचे आहे. तू पालकमंत्र्यांकडे जा असा सल्ला दिला होता.