आकाश सावंत
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यात त्या आपल्या राजकीय निवृत्तीबाबत बोलत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. केजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की माध्यमांनी ‘ताई रिटायर्ड होणार' अशा बातम्या केल्या, पण मी रिटायर्ड होणार नाही, मी चांगली खमकी आहे. इतकंच नाही तर, ‘रिटायर्ड कशामुळे व्हायचं? दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं,' असं सूचक विधानही त्यांनी केलं.
त्यांच्या या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ काढले जाता आहेत. पुर्वीच्या आक्रमक पंकजा मुंडे या निमित्ता पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या आहेत. परळी महामार्गावरून प्रवास करताना तोच रस्ता, तीच माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते, असं काही दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. मात्र आता केजमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी आपल्या रिटायरमेंटच्या चर्चेवर थेट भाष्य केलं आहे. माध्यमांनी ‘ताई रिटायर्ड होणार' अशा बातम्या केल्या, पण मी रिटायर्ड होणार नाही, मी चांगली खमकी आहे, असं त्या म्हणाल्या. इतकंच नाही तर, ‘रिटायर्ड कशामुळे व्हायचं? दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं,' असं सूचक विधानही त्यांनी केलं.
त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या ‘दोन-चार लोकां'चा रोख नेमका कुणाकडे? हा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. रिटायरमेंट नाही, तर आता ‘दोन-चार' व्यक्ती कोण? याचीच उत्सुकता वाढली आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण ही केली. गोपीनाथ मुंडे आणखी पाच वर्षे असते तर चित्र वेगळं असतं. आज ही ते तुमच्यासाठी काम करत राहीले असते. त्यांनी खुप कष्ठ सोसली आहेत असं ही पंकजा यावेळी म्हणाल्या. पण उपस्थितांच्या लक्षात त्यांच्या निवृत्तीच्या वक्तव्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे कोणाला निवृ्त्त करतात हेच येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे.