बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. सर्व बिहारी नेते निवडणुकीच्या रणधुमाळीत सहभागी झाले आहेत. पण या रणधुमाळीत चर्चा राज आणि उद्धव ठाकरे यांची होत आहे. बिहारची निवडणूक असताना ठाकरेंचा मुद्दा गाजताना दिसत आहे. जन स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी या दरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचे मात्र कौतूक केले आहे. एका खाजगी वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी या मुलाखतीत राज ठाकरें यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत बिहारींना मारहाण केली जाते. हिंदी भाषीकां विरोधात मनसे आक्रमक होते. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी राज ठाकरे हे लंपन एलिमेंट आहेत असं वक्तव्य केलं आहे. लंपन हा हिंदी शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ असामाजिक आणि गुंड व्यक्ती असा होतो. त्यांनी थेट राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. एकीकडे त्यांनी राज ठाकरे यांचा लंपन असा उल्लेख करताना दुसरीकडे मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतूक केले आहे. शिवाय त्यांचे आभारही मानले आहेत.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
2020 साली आपण उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम केले होते. त्यावेळी आपण त्यांच्याकडून फी म्हणून बिहारींना मुंबई मारहाण करू नका. त्यांना मारहाण होवू देवून नका हे मागितलं होतं. त्यानंतर कधीही मुंबईत बिहारी किंवा हिंदी भाषिकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नाही. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे. मी त्यांचे धन्यावाद करतो. मी उद्धव ठाकरेंना निवडणुकीत मार्गदर्शक म्हणून मदत केली होती. त्या बदल्यात त्यांनी आपण जे मागितलं होतं तो शब्द त्यांनी पाळला असं ही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे बिहारच्या निवडणुकीतील वातावरण तापलं असताना प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ही तापण्याची दाट शक्यता आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील अशी शक्यता आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बिहारी राहातात. दरम्यान या निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जन स्वराज्य पार्टी सर्व जागा लढत आहेत. आपण बिहारच्या विकासासाठी ही निवडणूक लढत असल्याचं ते म्हणाले. शिवाय गेल्या तिन महिन्यात जवळपास 3500 किमीची यात्राही आपण बिहारमध्ये केल्याचे ते म्हणाले.
नक्की वाचा - Pratap Sarnaik: 'मी हिंदी बोलतो काही फरक पडत नाही', सरनाईक बोलले मराठी प्रेमी भडकले
या निवडणुकीत आपल्यावर वोट कटवा अशी टिका होते. ती बरोबर आहे. आपण दोन्ही आघाड्यांची मत खाणार आहोत असं ही ते म्हणाले. या निवडणुकीत आपल्या पक्षाला दहा पेक्षा कमी किंवा दिडशे पेक्षा जास्त जागा मिळतील असं भाकित त्यांनी व्यक्त केलं आहे. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. नोव्हेंबरमध्ये इतिहास लिहीला जाईल असं ही ते यावेळी आवर्जून म्हणाले. शिवाय आपल्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाय मुस्लिम उमेदवारा विरोधात आपण उमेदवार देणार नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. नवभारत टाईम्स वृत्त वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.