जाहिरात

Pratap Sarnaik: 'मी हिंदी बोलतो काही फरक पडत नाही', सरनाईक बोलले मराठी प्रेमी भडकले

मिरा-भाईंदरमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Pratap Sarnaik: 'मी हिंदी बोलतो काही फरक पडत नाही', सरनाईक बोलले मराठी प्रेमी भडकले
मीरा रोड:

मनोज सातवी 

नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून मराठी भाषा प्रेमींचा रोष ओढवला आहे. एका कार्यक्रमादरम्यान "मराठी हिंदी वाद जे असेल ते असेल, तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल. मी सुद्धा जरी मराठी आमदार असलो, तरी मी माझ्या जनतेसोबत ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यावेळेस हिंदीमध्ये बोलतो काही फरक नाही पडत मला" असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाय हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या मराठी मोर्चाने राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्याच ठिकाणी आता शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी  केलेल्या वादग्रस्त विधानानेपुन्हा एकदा मराठी – हिंदी वाद पेटण्याची शक्यता आहे. सरनाईक सातत्याने हिंदीबाबत सकारात्मक भूमिका घेत असून हिंदी मतदारांना आकर्षित करून घेण्याची खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे. गेल्या जून महिन्यात मुंबई हिंदी पत्रकार संघाने  वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात "माझा मतदारसंघ ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये येतो. ठाण्यात मी मराठी  बोलतो, पण मीरा-भाईंदरमध्ये माझ्या तोंडून हिंदी भाषा निघते. मराठी आमची आई आहे, तर हिंदी लाडकी बहीण आहे", असेही ते म्हणाले होते.  

नक्की वाचा - Akola News: अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दिवसाढवळ्या अश्लील चाळे, Video viral

ओवळा-माजिवडा हा प्रताप सरनाईक यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. येथून ते सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. ओवळा-माजिवडा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 9 ते 16, 37 ते 40, 45 आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 9 आणि 11 यांचा समावेश होतो. ओवळा-माजिवडा मतदारसंघात म्हणजे ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती आहे. याच कारणामुळे ओवळा-माजिवडा उच्चभ्रूंचा मतदारसंघ म्हणूनही ओळखली जातो. यामध्ये हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सरनाईक यांनी हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाणूनबुजून  हिंदीकडे झुकलेली भूमिका घेतली आहे का? कारण मिरा-भाईंदर महापालिकेत हिंदीभाषिक मतदारांचा मोठा प्रभाव आहे. असा सवाल विचारला जात आहे. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. 

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार

मिरा-भाईंदरमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मिरा-भाईंदर हे सर्व जातीधर्मांचे शहर आहे. इथे अनेक हिंदीभाषिक नागरिक आहेत. त्यामुळे जर आवश्यक असेल तर आपण हिंदी भाषेत संवाद साधावा, यात गैर नाही. पुढे ते म्हणाले की, मी स्वतः मराठी आमदार असलो तरी, जनतेशी संवाद साधताना जर हिंदी बोलण्याची वेळ आली, तर मी ती बोलतो.  या त्यांच्या वक्त्यावर मीरा भाईंदरचे मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा - 'मी रात्री तुमच्यासोबत झोपू का…', आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीकडे अभिषेक बच्चनने व्यक्त केली होती इच्छा

सरनाईक यांच्या या वक्तव्याचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील मराठी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.  विशेष म्हणजे या कार्यक्रमात ठाणे उपस्थित असलेले मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा हे मूळचे आसाममधील असूनही त्यांनी संपूर्ण भाषण मराठीत केले. परंतु त्यानंतर मंचावर आलेले मंत्री सरनाईक हिंदीत बोलू लागले, मराठी मंत्र्यांना मराठी प्रेक्षकांसमोर हिंदीत बोलायची गरज काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com