Trending News: "300 कोटी मिळाले तर..",काँग्रेस आमदार निर्मला सप्रेंच्या विधानाने खळबळ, भाजपचंही टेन्शन वाढलं

मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सागर जिल्ह्यातील बीना विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला सप्रे यांच्या विधानामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bina MLA Nirmala Sapre latest News

Nirmala Sapre Bina MLA MP Politics: मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सागर जिल्ह्यातील बीना विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला सप्रे यांच्या विधानामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं आहे. माध्यमांशी बोलताना निर्मला सप्रेनं म्हटलंय की,"जर उमंग सिंघारने 300 कोटी रुपये दिले, तर त्या त्यांना पाठिंबा देतील. जो पक्ष बीना विभागाला जिल्हा बनवेल,त्याला मी पाठिंबा देईल",असंही सप्रे म्हणाल्या आहेत.

मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा अनेक घडामोडींनी डोकं वर काढलं आहे. सागर जिल्ह्यातील बीना विधानसभा मतदारसंघातील आमदार निर्मला सप्रे यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सप्रे यांच्या "300 कोटींच्या.." प्रतिक्रियेमुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील अंतर्गत धुसफूस स्पष्टपणे समोर आली आहे. राजकीय विश्लेषक याला आमदारांची नाराजी, दबावाचं राजकारण आणि भविष्यातील राजकीय हालचालींना जोडून पाहत आहेत. 

Advertisement

निवडणूक काँग्रेस तिकीटावर जिंकली.पण..

निर्मला सप्नेनं विधानसभा निवडणूक काँग्रेस तिकीटावर जिंकली.पण निवडणुकीनंतर ते अनेकदा भाजप नेत्यांसोबत कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले. यामुळे त्यांची भाजपात सामील होण्याची अटकळे वाढली. परंतु, आतापर्यंत त्यांनी औपचारिकपणे कोणत्याही पक्षांतराची घोषणा केलेली नाही. निर्मला सप्रे यांच्याविरोधात जबलपूर हायकोर्टात काय पक्षांतर कायद्यानुसार याचिकाही दाखल केली आहे.

नक्की वाचा >> Jalna News: नवरदेवाचा बूट पळवला अन् लग्न मंडपात झाला तुफान राडा, करवल्यांनी झिंज्या उपटल्या अन्..पाहा Video

बीना शहराचा विकास आणि जनतेच्या मागण्यांना प्राधान्य

याचिकेत आरोप लावण्यात आला आहे की, काँग्रेसकडून निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पक्षातून बाहेर पडत भाजपचं समर्थन केलं. त्यानंतर भाजपच्या गोटात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. सप्रे यांनी बीना विभागाला जिल्हा बनवण्याच्या जुन्या मागणीलाही दुजोरा दिला. त्यांनी म्हटलं की, बीना शहराचा विकास आणि जनतेच्या मागण्यांना पहिलं प्राध्यान देते. दुसरीकडे भाजपकडून याप्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.पण राजकीय गोटात अशी चर्चा आहे की, निर्मला सप्रेची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर राजकारणात नवीन समीकरणं बनू शकतात. हायकोर्टात पक्षांतर प्रकरणावर काय निर्णय येतो, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Topics mentioned in this article