आमचं ठरलं! सोलापुरात भाजपचं टेन्शन वाढलं, माजी मंत्र्याला अवघड जाणार?

सोलापूर शहर उत्तर मतदार संघ भाजपचा गड मानला जातो. सलग चार वेळा या मतदार संघातून भाजपच्या विजयकुमार देशमुख यांनी बाजी मारली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
सोलापूर:

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. सर्व पक्षीय इच्छुकही जोरदार मोर्च बांधणी करत आहे. मतदार संघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती सगळीकडेच आहेत. पण काही मतदार संघ हे लक्षवेधी ठरत आहेत. त्या पैकीच एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर शहर उत्तर मतदार संघ आहे. हा मतदार संघ तसा भाजपचा गड मानला जातो. सलग चार वेळा या मतदार संघातून भाजपच्या विजयकुमार देशमुख यांनी बाजी मारली आहे. मात्र यावेळी देशमुख यांच्या समोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान विरोधकांचे नाही तर स्वपक्षायांचेच आहे. त्यामुळे देशमुखां समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोलापुर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील चार टर्म इथून विजयकुमार देशमुख हे विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. सोलापूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यावेळी पुन्हा ते विधानसभेच्या रिंगणात उतरतील असे संकेत देण्यात आले आहे. असं असलं तरी त्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर आली आहे.याच मतदार संघातून निवडणूक लढवण्यास भाजप नेते चन्नवीर चिट्टे हे इच्छुक आहेत. त्यांनी मतदार संघात लावलेल्या बॅनरमुळे सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बायको नसते, तर लाडकी बहीणच असते' साहेबांचा पठ्ठ्या दादांनाच भिडला

विद्यमाना आमदार आणि माजी मंत्री असलेल्या  विजयकुमार देशमुख यांना भाजप पदाधिकारी असलेल्या चन्नवीर चिट्टे यांनी थेट आव्हान दिले आहे. आमचं ठरलयं!लक्ष सोलापूर शहर उत्तर विधानसभा 2024 अशा आशयाचे मोठ मोठे बॅनर संपूर्ण मतदार संघात लावण्यात आले आहेत. विधानसभेच्या तोंडावर इच्छुकांची ही मोर्चे बांधणी पक्षनेतृत्वाची मात्र डोकेदुखी ठरणार आहे. या मतदार संघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे चिट्टे यांचे मनोबलही उंचावले आहे. शिवाय विजयकुमार देशमुख सलग चार टर्म आमदार असल्याने त्यांना आता विश्रांती दिली जाईल असेही त्यांना वाटत आहे.    

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला

चन्नवीर चिट्टे हे भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे.  गेल्या 32 वर्षांपासून ते पक्षाचे काम करत आहेत. शहर उत्तर विधानसभेचे माजी आमदार लिंगराज वल्याळ यांचे स्वीय सहायक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे चिट्टे यांचा मतदार संघात चांगला संपर्क आहे. गोपिनाथ मुंडेंचे ते विश्वासू समजले जात होते. विजयकुमार देशमुख हे चार टर्म आमदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देवू नये असं वाटणारा एक गट मतदार संघात आहे. शिवाय भाजप नेहमी धक्कातंत्र वापरतं. तसे झाले तर देशमुख यांचा पत्ता कट होवू शकतो. अशा वेळी चिट्टे यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे.  
 

Advertisement