जाहिरात
This Article is From Aug 09, 2024

विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला

विधानसभा निवडणुका कधी होतील. कोणत्या महिन्यात होतील हे ही जयंत पाटील यांनी सांगून टाकले आहे.

विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला
पुणे:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव स्वराज्य यात्रा आजपासून सुरू झाली आहे. शिवनेरापासून सुरू झालेल्या या यात्रेवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवत अजित पवारांनाही लक्ष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुका कधी होतील. कोणत्या महिन्यात होतील हे ही सांगून टाकले. मात्र निवडणुका कधीही झाल्या तरी महाविकास आघाडीच्या पारड्यात किती जागा पडणार आहेत याचा आकडाही यावेळी त्यांनी सांगितला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुका कधी होणार? 

विधानसभा निवडणुकांची कधीही घोषणा होवू शकते. सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही शिव स्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या यात्रे वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकी बाबत मोठे विधान केले आहे. पाटील म्हणाले की हे सरकार सध्या घाबरलेले आहे. त्यामुळं हे सरकार विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेईल. कदाचित 15 नोव्हेंबर नंतर निवडणुका होतील असंही ते म्हणाले. तो पर्यंत जनतेची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने, आपली तिजोरी खाली करण्यासाठी त्यांना अधिकचा वेळ मिळणार आहे. त्यासाठीच निवडणुका लांबवणीवर टाकल्या जातील असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली, जयंत पाटील, कोल्हे थोडक्यात बचावले; Video मध्ये पाहा नेमकं काय घडलं

मविआला किती जागा मिळणार? 

विधानसभा निवडणुका कधीही झाल्या तरी महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर मविआचे जवळपास  170 आमदार निवडून येतील असा ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काही ही करेल.  तुम्हाला चंद्र आणून देण्याची योजना ही हे सरकार सुरू करू शकतं. लोकसभेला न आठवलेली बहीण विधानसभेपूर्वी त्यांना आठवली आहे असे जयंत पाटील म्हणाले. 

ट्रेडिंग बातमी -  विधानसभेतील 70 जागांवर शरद पवार गटाचं सर्व्हेक्षण; कशी ठरवणार निवडणुकीची रणनीती?

'आता माफी मागून काय फायदा?' 

शिव स्वराज्य यात्रेची पुणे जिल्ह्यातून सुरूवात होत असताना जयंत पाटील यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. कांदा निर्यातीबाबत अजित पवारांनी माफी मागितली आहे. त्यावर अजित पवारांनी आता माफी मागून काय फायदा असा सवाल त्यांनी केला. जो बुंद से गये वो, हौदसे नहीं आते. आता माफी मागून काय फायदा. गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो, मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय का नाही मिळाला. हे दिल्लीला फक्त सरकार वाचवण्यासाठी गेले होते, कांद्याला दर मिळवून आणला असता तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात पाटील यांनी अजित पवारांना सुनावले. 

ट्रेंडिंग बातमी - देशाला ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं पण... तुरुंगात पोहचला! हिरो ते झिरोपर्यंत पूर्ण केला प्रवास

जुन्नरचा विधानसभेचा उमेदवार कोण?

शिव स्वराज्य यात्रेच्या पहिल्याच सभेतुन जुन्नर विधानसभेचा उमेदवार कोण? असा प्रश्न जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारला. शिवाय उमेदवार जाहीर करू का अशी विचारणाही यावेळी त्यांनी केला. त्यानंतर शरद पवार हा विचार आहे. हाच स्वाभिमानाचा विचार उमेदवार असेल असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं. मात्र खरं नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: