राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची (Madhukar Pichad met Sharad Pawar) भेट घेतल्याचं समोर आलं आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्या सोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाली. पिचड कुटुंबीय सध्या भाजपमध्ये आहेत. शरद पवारांच्या भेटीनंतर ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा - पंढरपुरातील मंदिरासाठी 129 कोटींचा निधी मंजूर, भगूरमध्ये सावरकरांवर थीम पार्कही उभारणार!
महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार आहे. त्यामुळे पिचड पिता-पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे.
मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे हे विजयी झाले होते. त्यात आज किरण लहामटे महायुतीसोबत असल्यामुळं अकोले विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पिचड हे शरद पवारांसोबत जाणार असल्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.