एकनाथ खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कधी होणार? बावनकुळेंनी दिलं उत्तर

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

Chandrashekhar Bawankule on Eknath Khadse : माजी भाजपा नेते एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा स्वगृही जाण्यासाठी इच्छूक आहेत. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता. 

लोकसभा निवडणुकीला तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यानंतरही खडसेंच्या भाजपा प्रवेशाची प्रतीक्षा संपलेली नाही. खडसेंचा भाजपा प्रवेश कधी होणार? आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा रोल काय असणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. त्यातच आज (सोमवार, 2 सप्टेंबर)  रोजी खडसेंचा वाढदिवस आहे. खडसेंनी स्वत:च्या वाढदिवशी भाजपा प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार का? असा प्रश्न विचारण्यात येत होता.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'खडसे काय म्हणाले ते माहिती नाही. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे आयुष्य मंगलमय होवो. 

लोकसभा निवडणुकीत त्यांनी रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्यासाठी आम्हाला मदत केली. ते तशी मदत पुढेही करतील. ते आमच्यासोबत राहतील हा विश्वास आहे,' असं बावनकुळे यांनी सांगगितलं. बावनकुळे यांनी खडसे भाजपासोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केलाय. पण, त्यांच्या पक्षप्रवेशाची अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : नितीन गडकरींच्या वाहनाचे स्टेअरिंग भाजपाच्या जुन्या नेत्याच्या हाती, विदर्भात चर्चांना उधाण )
 

काय म्हणाले होते खडसे?

त्यापूर्वी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेशाबाबत भाजपाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं वक्तव्य केलं होतं.  'भारतीय जनता पार्टीकडं पक्षप्रवेशासाठी विनंती केली होती. पण भाजपाकडून अद्याप तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा मी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडं दिला आहे. पण, त्यांनी अद्याप तो स्विकारलेला नाही. 

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )
 

मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे. शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास मनाई केली आहे. मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल नाही तर माझा मुळ पक्ष राष्ट्रवादी आहे तो जॉईन करुन मी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा उत्साहानं काम करेल,' असं खडसेंनी सांगितलं.

Advertisement
Topics mentioned in this article