Manoj Jarange Patil : 'भाजपातील स्फोट तुम्हाला दिसेल, पक्षातील मराठा...' जरांगेंचा नवा आरोप

Manoj Jarange Patil on BJP :  मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यंंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

Manoj Jarange Patil on BJP :  मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यंंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. जरांगे सध्या बीड जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहेत. बीड विधानसभा मतदारसंघातील झालेल्या घोंगडी बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. भारतीय जनता पक्षातील स्फोट तुम्हाला दिसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भाजपाच्या माजी आमदारांची रांग

आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील घोंगडी बैठका घेत असल्याचं मानलं जात आहे. त्यांनी बीडमधील या कार्यक्रमातही भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं.

निवडणुका जाहीर होताच आपल्याला बैठका घ्यायच्या आहेत. मराठ्यांची हार होऊ देऊ नका. भाजपातील मराठा आता फडणवीसांपासून दूर चालला आहे. भाजपाच्या माजी आमदारांची रांग लागत आहेत. त्यांचे आमदार रात्रीच भेटायला येतात. भाजपाचा स्फोट तुम्हाला दिसेल, असा दावा त्यांनी केला. भाजपाच्या पुण्यातील एका नेत्यानं फ्लॅट विकला पण, त्याला तिकीट मिळणार नाही, असं म्हणतात, असं जरांगे म्हणाले.

( नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील मैदानात, बीड जिल्ह्यात कुणाची वाढवणार डोकेदुखी ?)
 

बीडने राईट पाडापाडी केली

बीडमधील लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार पंकजा मुंडे पराभूत झाल्या. पंकजा या राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्या आहेत. जरांगे यांनी या बैठकीत निवडणुकीचा संदर्भ देत बीडनं राईट पाडापाडी केली, असं सांगितलं. जनतेला प्राधान्य देणारा बीड हा जिल्हा आहे. आधी जात आणि नंतर पक्ष. जातीला पाठ दाखवून मागं फिरायचं नाही, असं त्यांनी बजावलं. छगन भुजबळ यांनी एकूण समाजाला विरोध केला तर 140 घरी गेले समजा, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकार कसं बनवायचं हे फडणवीसांना माहिती आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात आणि फडणवीस त्यांना पक्षात घेतात. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार. लोकं बैलगाड्या घेऊन 60 किलोमीटर अंतरावरुन आले आहेत. फडणवीस साहेब माणुसकी जिवंत करा. आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असं जरांगे यांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितलं.