Pankaja Munde : 'आता माझे पंचांग नीट होईल,' मंत्रिपदाची शपथ घेताच पंकजा मुंडे यांचं ते वक्तव्य चर्चेत

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या एका जुन्या  वक्तव्याची सध्या बीडमध्ये चर्चा सुरु आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
पंकजा मुंडे यांनी पाच वर्षानंतर कमबॅक केलं आहे.
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला होता. त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय पडता काळ सुरु होता. हा पडता काळ आता संपला आहे. पंकजा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या एका जुन्या  वक्तव्याची सध्या बीडमध्ये चर्चा सुरु आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होतं वक्तव्य?

यावर्षी फेब्रुवारीमध्या परळी वैजनाथमध्ये झालेल्या ब्रह्म ऐक्य परिषदेत पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्या परिषदेमध्ये पंकजा यांनी पंचागकर्ते मोहन दाते यांचा सत्कार केला होता. त्यावेळी ' पंचागकर्ते दाते यांना पुरस्कार प्रदान करता आला, हे माझे भाग्य आहे.  मला वाटते की आता माझे पंचांग नीट होईल' असं वक्तव्य पंकजा यांनी केलं होतं. .

पंकजा यांचं हे वाक्य 2024 हे वर्ष संपताना खरं ठरलंय. पंकजा मुंडेंसाठी 2024 हे वर्ष चढउताराचं होतं. यावर्षी बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपानं उमेदवारी दिली होती. त्या लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना निसटता पराभव सहन करावा लागला. मराठा नेते मनोज जरांगे फॅक्टर यांनी विरोध केल्यामुळेच पंकजा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.

Advertisement

( नक्की वाचा : Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास )

या पराभवानंतरही भाजपाचा पंकजांवरील विश्वास कायम होता. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांना पक्षानं उमेदवारी दिली. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात झालेल्या प्रत्येक विधानपरिषद निवडणुकीपूर्वी पंकजा यांच्या नावाची चर्चा होत होती, पण त्यांना नेहमी उमेदवारीनं हुलकावणी दिली. अखेर यंदा त्यांना भाजपानं उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत विजयी होऊन पंकजा आमदार झाल्या.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा यांचा समावेश झाला आहे. त्यानंतर 'मला वाटते की आता माझे पंचांग नीट होईल',' हे पंकजा मुंडे यांचे वाक्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे

Advertisement
Topics mentioned in this article