अभिषेक भटपल्लीवार
राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यात काही जेष्ठ मंत्र्यांना डावलण्यात आले. त्या पैकीच एक सुधिर मुनगंटीवार हे ही होते. भाजप विधीमंडळ पक्षात सर्वात जेष्ठ आमदार हे सुधिर मुनगंटीवारच आहेत. असं असताना त्यांना मंत्रिपदापासून दुर ठेवण्यात आलं. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी आपली नाराज जाहीर पणे बोलूनही दाखवली आहे. ही नाराजी लपून राहीलेली नाही. जेव्हा संधी मिळते त्यावेळी सुधिर भाऊ सरकार विरोधात आता बोलू लागले आहेत. सध्या ते आपल्या मतदार संघात जास्त वेळ देत आहेत. त्यातूनच ते आता स्थानिकांच्या हक्कासाठी मैदानात उतरल्याचे दिसून येते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
चंद्रपूरात वीज निर्मिती प्रकल्प आहे. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसतो. याबाबत अनेक तक्रारी करूनही सरकार स्थानिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, असा इथल्या नागरिकांचा आरोप आहे. या वीज कंपनीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदुषणाचा फटका बसत आहे. त्यातून वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत, अशी स्थानिकांची तक्रारही आहे. त्यामुळे हे सर्व स्थानिक न्याय मिळाला यासाठी सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे गेले होते. त्यांनी सर्व हकीगत त्यांच्या कानावर टाकली.
त्यानंतर सुधिर मुनगंटीवार हे आक्रमक झाले. जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला रोप वेच्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा रोप वे चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागतोय.
ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई
स्थानिकांनी यासंदर्भात सुधिर मुनगंटीवार यांना भेटून याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर आज मुनगंटीवार प्रत्यक्ष घटनास्थळी पोचले. त्यांनी रोप वे आणि ध्वनी प्रदूषणाची स्थिती अनुभवली. त्यांनी लगेच वीज केंद्राच्या वरिष्ठांना बोलवून घेतले. शिवाय तिथली परिस्थिती काय आहे हे सांगितले. शिवाय ही समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. मात्र हे करताना त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला इशारा दिला. आम्ही शंभर वाघांचे सहाशे वाघ करू शकतो, तर वाघाचा पंजा पण मारू शकतो, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.