'....तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल', भाजपा आमदार पडळकरांची जीभ घसरली

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांची जीभ घसरली.

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. विधानपरिषदेतील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. या आंदोलनादरम्यान पडळकर यांनी एक वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळं मटण हा विषय चर्चेत आला आहे.


काय म्हणाले पडळकर?

दरम्यान यावेळी पडळकर यांनी भाषणाला सुरुवात केली. या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की, धनगर बांधवांनी जर बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल. पडळकर यांच्या भाषणातील हा मुद्दा जोरदार चर्चेत आला आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मेंढपाळांचा प्रश्न गंभीर

पडळकर म्हणाले की, 'धनगर समाज मोठ्या प्रमाणे मेंढी पालन हा व्यवसाय करतो. हे मेंढपाळ अनेक गावोगावी फिरत असतात.  कोल्हापूरातील मेंढपाळांना जिल्हा बाहेर जावं लागतं. त्यांच्यासोबत त्यांची बायका, पोरं असतात. त्यांच्या शिक्षणाचा, राहण्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं. वर्षानुवर्षे हा समाज अंधारात आहे. जर हळूहळू ही मेंढपाळ समाजाची पिढी नष्ट होत गेली तर परिस्थिती गंभीर होईल.' आरक्षणाने या समाजाला बळ मिळेल असं पडळकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आदिवासी समाजाला आमच्या आरक्षणाचा धक्का असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. पण असं अजिबात नाही. ज्या भागात आदिवासी आहे त्या भागात आमचा समाज तुलनेने कमी आहे. आमच्या समाजाचे नेतृत्व करणारे नेते देखील कमी आहेत. आरक्षण मागणं ही राजकीय खेळी नसून समाजाला बळकट करण्यासाठी सुरु आहे.  

( नक्की वाचा : 'सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची कडवट टीका )

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे.  धनगर समाजाला काहीच मिळाले नाही. कारखाने आमच्याकडे आहेत का? नाहीत म्हणून आम्ही आरक्षण मागतो आहोत. दोन नेत्यांच्या सुतगिरीण्या सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा, असा सवालही पडळकर यांनी केला. आमचा सरपंच होतो कारण गावच आमचं आहे. पण आमचा समाज अजूनही विकसित व्हयला हवा अशी इच्छा आहे. आमची पोरं शिकून मोठी व्हायला हवीत असं आम्हाला वाटत. प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळायला हवं. त्यामुळं  सरकारने तत्काळ एसटीमधून आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. 

धनगर समजा आठ-आठ दहा-दहा महिने मेंढरं घेऊन बाहेर राहतो.  त्याला घर कुठं आहे? महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या दर्जाचे मांस मिळावे म्हणून दिवसाला कित्येक किलोमीटर चालतोय. पण कुणाच्या रानात चुकून मेंढरं गेली तर मेंढपाळाला गुराढोरा सारखं मारलं जातं. पोलिस याची कोणतीही दखल घेत नाहीत, हा अन्याय आम्ही का सहन करायचा?  धनगर हा मेंढपाळ समाज सुस्थितीत राहावा यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.