महाराष्ट्रातील नेता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी? कोणकोणत्या नावांची चर्चा?

जेपी नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजप पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये जेपी नड्डा सामील होताच भाजपचे अनेक राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला देणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जेपी नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजप पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान तीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये ओम माथूर, सुनील बन्सल, के. लक्ष्मण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यासोबतच महाराष्ट्राचे भाजप नेते विनोद तावडे यांचीही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय होते. सध्ये ते बिहारचे प्रभारी आहेत.  आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. 

नक्की वाचा - 2 वेळा काँग्रेसच्या खासदार, सध्या आंध्राच्या भाजप प्रदेश अध्यक्षा डी. पुरंदेश्वरी लोकसभा अध्यक्षपदी?

ओम माथूर - 
ओम माथूर सध्या राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार असून आरएसएसचे प्रचारक म्हणून काम करतात. त्यांनी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणूनही काम केलं आहे. 

सुनील बन्सल - 
सुनील बन्सल सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहतात. ते राजस्थानचे भाजपा नेते असून त्यांनी  उत्तर प्रदेश निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली. संघाचे कार्यकर्ते, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशाचे प्रभारी  म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. अमित शाह आणि सुनील बन्सल हे 2014, 2017, 2019 आणि 2023 या सगळ्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात अनुक्रमे प्रभारी आणि सहप्रभारी होते.

Advertisement

के. लक्ष्मण - 
भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून के. लक्ष्मण यांचं नाव घेतलं जातं. के. लक्ष्मण यांनी तेलंगणा भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. ते  मुशीराबादचे आमदार होते आणि सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.