25 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या 65 वर्षीय भाजप नेत्याचा एका महिन्यातच मृत्यू, पहिल्या पत्नीच्या..

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भाजप नेते नईम खान यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. 65 वर्षांच्या नईम खानने एका महिन्याआधीच 25 वर्षीय तरुणीसोबत लग्नगाठ बांधली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
BJP Leader Naim Khan Shocking Death
मुंबई:

BJP Leader Shocking Death : मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भाजप नेते नईम खान यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. 65 वर्षांच्या नईम खानने एका महिन्याआधीच 25 वर्षीय तरुणीसोबत लग्नगाठ बांधली होती. खान यांचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीच्या वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी खान तिच्या घरी जात होते आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आलीय. खान यांच्या दुसऱ्या लग्नाची कहाणीही भन्नाट होती. रिहाना नावाच्या तरुणीने मागील महिन्यात नईम खान यांच्याविरोधात छेडछाड केल्याचा आरोप केला होता. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नईमवर कारवाई केली जाणार होती. पण त्याआधीच नईम आणि रिहाना एकत्र सागर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. रिहानाने तिची तक्रार मागे घेतली आणि दोघंही लग्न करणार असल्याची माहिती दिली. 

65 वर्षांचे नईम आणि 25 वर्षांची रिहाना

त्यांच्या वयात 40 वर्षांचा फरक होता,तरी दोघांमध्ये वादविवाद होत असल्याच्या बातम्या समोर आल्या.नईम पहिल्या पत्नीपासून वेगळे होऊन रिहानासोबत सागर येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते. तब्येत बिघडल्याने नईम खान यांना तातडीने बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले,पण त्यांचा मृत्यू झाला.रिहानाशी लग्नाची घोषणा करताना नईम खान खूप आनंदी दिसत होते,पण काही काळातच दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये नव्या तक्रारी दाखल केल्या.नईम खानमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याने भाजपने त्यांना पक्षातून बाहेर काढले. 

नक्की वाचा >> Viral Video: भाजप आमदाराच्या मुलानं खरेदी केली 1111111 रुपयांची घोडी, खासीयतही भन्नाट, युद्धकाळात...

नईम खानच्या मुलाची हत्या

नईम खान एमपीमध्ये पीली कोठी दरगाह ट्रस्टचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा इमरानची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात दरगाह ट्रस्टच्या माजी प्रमुखांसह इतरांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. या हत्याकांडात अनेकांना अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> लेक रात्री 2 वाजता ढसाढसा रडत होती, बापाने केलं असं काही..व्हिडीओ पाहून सर्वच आई-वडिलांचे डोळे पाणावतील!

अचानक झालेला मृत्यू संशयास्पद 

कोणतंही गंभीर आजारपण नसताना नईम खान यांचा अचानक मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.परिसरातील लोक रिहानाशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधांबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.हे प्रकरण त्यांच्या मालमत्तेशी संबंधीत असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. सागर जिल्ह्यातील पोलीस त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

Advertisement