Thane News : ठाणे लोकसभा निवडणूक, राजन विचारे यांना मोठा धक्का; हायकोर्टाने याचिका फेटाळली

Bombay High Court Dismisses Rajan Vichare's Petition : ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार राजन विचारे यांना मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rajan Vichare : राजन विचारे यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.
मुंबई:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

Bombay High Court Dismisses Rajan Vichare's Petition : ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार राजन विचारे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडीला आव्हान देणारी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे नरेश म्हस्के यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झाले असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत नरेश म्हस्के यांना 7,34,231 मते मिळाली, तर राजन विचारे यांना 5,17,220 मतांवर समाधान मानावे लागले.

( नक्की वाचा : Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाचा नंबर गेम: NDA की INDIA? विजयाचे गणित काय सांगते? )
 

निवडणुकीतील पराभवानंतर राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. नरेश म्हस्के यांची खासदारकी रद्द करून त्यांच्या जागी आपली निवड जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप विचारे यांनी केला होता. याचिकेच्या समर्थनार्थ त्यांनी काही दस्तऐवजही सादर केले होते.

या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकलपीठासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली. अखेर मंगळवारी न्यायालयाने आपला निर्णय जाहीर करत राजन विचारे यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नरेश म्हस्के यांची खासदारकी वैध ठरली आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article