Buldhana News: आदिवासी मुलींचे शोषण, पुरावे ही हातात, सेना आमदारामुळे भाजपचा नेता अडचणीत येणार?

आता लैंगिक शोषण आणि मानहानीच्या दाव्यापर्यंत हा वाद पोहोचल्याने महायुतीमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
बुलढाणा:

भाजप नेत्याकडून अल्पवयीन आदिवासी मुलींचे शोषण केले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे. शिवाय त्याचे पुरावे ही आपल्याकडे असल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. त्यामुळे या भाजप नेत्याच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गंभीर आरोप करत धुरळ उडवून दिला आहे.  या दोघांमधील राजकीय युद्ध आता वैयक्तिक आरोपांपर्यंत येऊन ठेपले आहे. या वादामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे हे बुलढाण्याचे अशोक खरात आहेत. त्यांनी अनेक आदिवासी अल्पवयीन तरूणींचे आयुष्य उद्धवस्त केलं आहे. आश्रम शाळेतील मुली भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बरबाद केल्या. त्यांना न्याय देण्यासाठी माझा लढा आहे असं गायकवाड म्हणाले. शिंदे यांच्याबाबतचे इतके पुरावे आपल्याकडे आहेत की कोणी अधिकारी, कोणी मंत्री यांनी हा विषय दाबायचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही असा इशारा ही आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून याचे पाप झाकू नये. यांनी किती आदिवासी मुली उद्ध्वस्त केल्या हे चौकशी केल्यावर तुम्हाला समजणार आहे. हा लिंगपिसाट दुसरा खरात बाबाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी असे आवाहन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले.

Advertisement

नक्की वाचा - Satara news: आठवीच्या पुस्तकातून मराठ्यांचा पराक्रम हटवला! NCERT च्या निर्णयावर तीव्र संताप, वाद पेटणार?

आमदार संजय गायकवाड यांच्या गंभीर आरोपानंतर भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पलटवार केला आहे. गायकवाड यांनी माझीच नाही तर आदिवासी समाजाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची तातडीने माफी मागावी. त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर 10 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे. शिंदे ही आता गायकवाड यांच्या विरोधात भलतेच आक्रमक झाले आहे. या दोघां मधील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. दोघे ही महायुतीत असले तरी त्यांच्यातून विस्तव ही जात नाही. गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत. ते शिंदे गटाचे नेते आहेत. तर विजयराज शिंदे माजी आमदार आहे. शिवाय ते सध्या भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आहेत. या दोघांमधील वाद आता टोकाला गेला आहे. 

नक्की वाचा - Shocking news: मंचुरियन-पनीर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर, तुम्ही ही बातमी नक्की वाचा

गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू होते. मात्र आता लैंगिक शोषण आणि मानहानीच्या दाव्यापर्यंत हा वाद पोहोचल्याने महायुतीमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधक आणि जनता मात्र या दोघांच्या यावादाची चांगलीच मजा घेत असल्याचे चित्र आहे. मात्र यातून दोन्ही नेते एकमेकांची बदनामी करत असल्याचं ही काही जण बोलत आहे. त्यामुळे वेळीच वरिष्ठांनी या दोन्ही नेत्यांना रोखलं पाहीजे असं ही काही नेते सांगत आहेत.