Sushil Kedia: 'मी प्रतिज्ञा करतो मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, ठाकरेंना भिडणारा 'तो' कोण?

मला मराठी आवडत नाही. मी ती शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे ते कर असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मराठी भाषेवरून सध्या राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या या विषयावर आक्रमक झाली आहे. मीरा रोडमध्ये एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर हे प्रकरण चिघळणार हे दिसत होतं. त्यानंतर मीरा रोडमधील व्यापाऱ्यांनी बंद ही पाळला. आता तर एक गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. शिवाय काय करायचं आहे ते कर असा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.  त्यात आता लवकरच केडीयांना मनसे काय आहे हे समजेल असा इशारा मनसे नेत्यांनी दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुशील केडीया हे एक गुंतवणूकदार आहेत. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत आपला व्यावसाय करतात. त्यांनी मराठीबाबत एक ट्वीट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की आय डोन्ट लव्ह मराठी,  आय डोन्ट लर्न मराठी, क्या करना है बोल. त्यांनी या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मी 30  वर्ष मुंबईत राहतो. पण मला मराठी निट समजत नाही. मला मराठी आवडत नाही. मी ती शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे ते कर असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - देशाचे गुन्हेगार लंडनमध्ये एकत्र! विजय माल्या आणि ललित मोदींनी पार्टीत म्हंटलं गाणं, पाहा Video

हे ट्वीट केल्यानंतर मनसैनिकांनी या केडीया यांना ट्वीटरवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की ठाकरे मराठी माणसाचे रक्षक असल्याचे फक्त भासवत आहेत. असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने मनसैनिक भलतेच चिडले आहेत. त्यात उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजय उत्सुव साजरा करणार आहेत. त्या आधी केडीया यांनी केलेल्या या वक्तव्याने हा वाद आणखी चिखळण्याची दाट शक्यता आहे. मराठी बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं मनसे आणि शिवसेनेनं स्पष्ट केले आहे. 

Advertisement