
Lalit Modi-Vijay Mallya Video: फसवणूक केल्यानंतरही कसं मजेत आणि आनंदात राहात येतं याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलचे माजी संचालक ललित मोदी आणि बुडीत निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे (Kingfisher Airlines) प्रमुख विजय माल्या हे सध्या भारतामधून फरार आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी लंडनमध्ये आश्रय घेतलाय. ते दोघं लंडनमधून अटक टाळण्यासाठी कायदेशीर खटपट करत आहेत. पण, त्याचवेळी त्यांचा आयुष्याचा आनंद उपभोगणे देखील सुरु आहे.
ललित मोदी आणि विजय माल्या यांचा लंडनमधल्या पार्टीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत त्यांनी एकत्र गाणं देखील गायलं आहे. ललित मोदींनी आयोजित केलेल्या पार्टीमधला हा व्हिडिओ आहे. यामध्ये त्यांचे जवळचे मित्र विजय माल्या देखील सहभागी झाले आहेत. या दोघांनी एकत्र गाणं म्हंटलंय. ललित मोदींनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये ते दोघे फ्रँक सिनात्रा यांचे प्रसिद्ध गाणे "माय वे" (My Way) गाताना दिसत आहेत.
( नक्की वाचा: Soham Parekh: एकाच वेळी 5 नोकऱ्या, रोज 2.5 लाख कमाई, कोण आहे सोहम पारेख? ज्यानं उडवलीय भारत ते अमेरिका खळबळ! )
कसली होती पार्टी?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही ललित मोदी यांनी आयोजित केलेली पार्टी होती. ही त्यांची दरवर्षी होणारी उन्हाळी पार्टी (summer party) होती. ललित मोदींनी सांगितले की, या पार्टीत 310 हून अधिक मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. यात अनेक देशांतून आलेले पाहुणेही होते. उपस्थित असलेल्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा (Royal Challengers Bangalore) माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल (Chris Gayle) देखील होता, ज्याने मोदी आणि माल्या दोघांसोबतचा आपला एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला आहे.
ललित मोदी आणि विजय माल्यावर आरोप काय?
इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक अध्यक्ष ललित मोदी यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या अनेक आरोपांनंतर 2010 मध्ये भारत सोडले. सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate - ED) त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग (money laundering), बोलींमध्ये हेरफेर आणि परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (Foreign Exchange Management Act - FEMA) उल्लंघनाशी संबंधित अनेक प्रकरणे दाखल केली आहेत. भारताने ब्रिटनकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची (extradition) वारंवार मागणी केली आहे, परंतु ते ब्रिटिश रहिवासीच आहेत. हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी यापूर्वी केला आहे.
तर, युनायटेड ब्रुअरीजचे (United Breweries) माजी अध्यक्ष आणि आता बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे (Kingfisher Airlines) प्रवर्तक विजय माल्या यांनी वाढते कर्ज आणि फसवणुकीच्या आरोपांखाली 2016 मध्ये भारत सोडले. भारत सरकारने त्यांना भगोडा आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत (Fugitive Economic Offenders Act) "भगोडा आर्थिक गुन्हेगार" (fugitive economic offender) घोषित केले आहे. गेल्या आठवड्यात, ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने (High Court) 2021 च्या दिवाळखोरीच्या आदेशाविरुद्ध (bankruptcy order) विजय माल्या यांनी दाखल केलेले अपील फेटाळले.
( नक्की वाचा : Operation Sindoor: 'आमच्याकडं फक्त 30 सेकंद...,' ब्राह्मोसमुळे पाकिस्तान का उडाली होती खळबळ? )
त्यांनी 'एक्स' (X) वर लिहिले, "मी अजूनही एक आर्थिक गुन्हेगार आहे. जोपर्यंत ईडी आणि बँका कायदेशीररित्या हे सांगत नाहीत की त्यांनी कर्जापेक्षा दुप्पट रक्कम कशी जप्त केली, तोपर्यंत मी दिलासा मिळण्यास पात्र आहे, ज्यासाठी मी प्रयत्न करेन." 900 कोटी रुपयांच्या आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) कर्जासंदर्भात त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यांनी सीबीआयवरही (CBI) प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world