Maharashtra Kesari: 'एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अन्यथा...',डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठणकावलं

महाराष्ट्र केसरी हा सन्मान असून त्याचा मान हा राखला गेला पाहीजे असं चंद्रहार पाटील म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चार-चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान आहे. हा अपमान बंद करा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा असली पाहीजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र केसरी हा सन्मान असून त्याचा मान हा राखला गेला पाहीजे असंही ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी संबधितांना इशाराही दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र केसरी ही एकच स्पर्धा झाली पाहीजे. तसे झाले नाही तर आपण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार, असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्ती संघटनेची ही एक संघटना असली पाहिजे.  

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025: "माझे पसंतीचे सिडकोचे घर" लॉटरीची नवी तारीख जाहीर, आता 'या' दिवशी निघणार लॉटरी

या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं पैलवान पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध करणार आहोत. या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र केसरी ही एकच स्पर्धा घेवून विजेत्याला एक कोटीचे  बक्षीस द्या अशी मागणी ही त्यांनी केली आहे.