संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आली होती. याचे कथन अनेकवेळा करण्यात आले होते. मात्र त्यांना कसे मारले याचे फोटोच पहिल्यांना माध्यमात समोर आले. त्यामुळे सर्वच जण हकबून गेले. मन सुन्न झालं. हैवानालाही लाजवेल असे ते फोटो होते. राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनतंर अखेर 84 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. मुंडें ऐवजी मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचा या निर्णय आता राष्ट्रवादीला घ्यावा लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. मुंडेच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का ? याची चर्चा रंगू लागली आहे. मुंडे हे ओबीसी होते. त्यामुळे त्यांच्या जागी ओबीसीनेता असावा असा मतप्रवाह आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
शिवाय धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न आणि नागरिपुरवठा मंत्रिपद ही भुजबळांनी भूषवलं आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. शिवाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कधी ही गच्छंती होवू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे भुजबळां सारखा नेता मंत्रिमंडळात असावा असा एक मतप्रवाह आहे. फडणवीस ही त्यासाठी अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
(नक्की वाचा- Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?)
भुजबळांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होणार आहे. तर ओबीसी समाजालाही प्रतिनिधीत्व मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा रोष कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच अधिवेशना होईल का याकडे इच्छुकांची नजर लागली आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ते कुणाची वर्णी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.