मुख्यमंत्री साहेब मला वाचवा, हे बोल कोणत्याही सर्व सामान्य गरीब व्यक्तीचे नाहीत. तर हे बोल आहेत चक्क भाजप कार्यकर्त्याचेच. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. मुख्यमंत्री साहेब मला वाचवा असं आर्जव केलं आहे,कृष्णा कारभारी यांनी. कृष्णा हे कल्याण इथले भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी या माध्यमातून आपल्या जीवाला कसा धोका आहे हे पण सांगितले आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे. शिवाय गृहमंत्री हे स्वत: देवेंद्र फडणवीस आहेत. असं असतानाही भाजपच्याच कार्यकर्त्यावर ही वेळ का आली याची चर्चा कल्याणमध्ये चांगलीच रंगली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कृष्णा कारभारी हे भाजपचं कल्याणमध्ये काम करतात. ते पदाधिकारीही आहे. त्याचं कल्याणमध्ये कार्यालय ही आहे. हे कार्यालय हडपण्याचा बिल्डर लॉबीचा डाव आहे असा त्यांचा आरोप आहेत. त्यातून त्यांच्या कार्यालयात काही लोक घुसले होते. त्यांनी तिथल्या सीसीटीव्हीचीही फोडतोड केली. या घटनेनंतर कृष्णा कारभारी हे हादरून गेले आहेत. त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री साहेब मला वाचवा. मी तुमचा कार्यकर्ता आहे. माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात आहे असं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय भाजपनेते आणि माजी मंत्री कपील पाटील यांनाही त्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असंही ते म्हणाले आहेत. यानंतर कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिवाय याबाबतची चर्चा ही रंगली आहे.