Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 'या' गोष्टीमुळे महायुतीचा पराभव, फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली

Devendra Fadnavis Interview : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

Devendra Fadnavis Interview : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) 400 पार चार नारा देणाऱ्या भाजपाला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही.  भाजपाची महाराष्ट्रातील कामगिरी या पिछेहाटीमधील महत्त्वाचं कारण ठरली. राज्यात भाजपाला फक्त 9 तर महायुतीला एकूण 48 पैकी 17 जागाच जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीनं 31 जागी विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय दिली कबुली?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या फेक नरेटीव्ह आणि व्होट जिहादमुळे राज्यात महायुतीचा पराभव झाला. महाविकास आघाडी विजयी झाली हा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं मांडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील सर्व भाषणामध्ये फडणवीस यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडला होता.

राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली जाहीर मुलाखत नागपूरमध्ये झाली. प्रवचनकार तसंच सोलापूर तरुण भारतचे माजी संपादक विवेक घळसासी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवावर महत्त्वाची कबुली दिली. 

( नक्की वाचा :  'राजकारणात काहीही होऊ शकतं', भावी समीकरणांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य )
 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं अतिआत्मविश्वास हे देखील कारण असल्याचं फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये मान्य केलं. लोकसभा निवडणुकीत माझ्यासह सर्व ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. त्यावेळी विरोधकांच्या प्रचाराचा लोकांवर परिणाम होणार नाही, असं वाटत होतं, पण दुर्दैवानं तो परिणाम झाला, हे फडणवीस यांनी पहिल्यांदाच मान्य केलं.

Advertisement

लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटीव्ह तयार करण्यात महाविकास आघाडीला यश आलं. त्या यशानंतर त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आला. तर आम्ही या निवडणुकीनंतर आमच्या विचार परिवाराला निवडणूक प्रचारात उतरण्याची विनंती केली असं फडणवीस म्हणाले.

शिंदे यांच्या चेहऱ्यावर फार हास्य नसते

भाजपाच्या 132 जागा आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री  न करणं हे जनतेलाही आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही आवडलं नसतं. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे साहेबांनी चर्चा केली. शिंदे साहेबांनी एका मिनिटात हे मान्य केलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Advertisement

एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर फारसे हास्य नसते. ते मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांच्या चेहऱ्यावर फार हास्य नसे, त्यामुळे ते उपमुख्यमंत्री झाल्यावर हास्य लोपले असा अर्थ काढू नये असं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होण्यास एकनाथ शिंदे सुरुवतीला तयार नव्हते. मी त्यांना माझा अनुभव सांगितला. तुमच्या पक्षासाठी तुम्ही सरकारमध्ये राहणं आवश्यक आहे, असं सांगितलं, ते शिंदे यांना पटलं असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.

मी उपमुख्यमंत्री पक्षाच्या आदेशानंतर झालो. मुख्यमंत्री मी त्यावेळी हो म्हणालो, पण लोकं काय म्हणतील ही मनात भीती होती. पण पक्षानं सांगितलं आणि मी जबाबदारी स्विकारली. पण, दोन दिवसांमध्ये मला देशभरातील कार्यकर्त्यांनी जितके फोन आणि संदेश केले त्यावर मी आज सांगू शकतो की,  मुख्यमंत्री झाल्यावर जितका सन्मान मिळाला नसता तितका मान-सन्मान उपमुख्यमंत्री झाल्यावर मिळाला, असं फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरावर म्हणाले.

Advertisement
Topics mentioned in this article