"लाडक्या बहि‍णींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती..", CM देवेंद्र फडणवीसांनी दिली खुशखबर!

"आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे.पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहि‍णींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती दीदी बनवा..लखपती दीदी.."

जाहिरात
Read Time: 3 mins
CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
मुंबई:

CM Devendra Fadnavis Mumbai Speech :  "मागच्या विधानसभेत आपल्या आशिर्वादाने आम्हाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं.आजपर्यंतच्या इतिहासात महायुतीला सर्वाधिका जागा या विधानसभा निवडणुकीत मिळाल्या. या जागा मिळाल्यानंतर काही लोकांनी बोलणं सुरू केलं, आता महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या,आता यांना कोणाची गरज नाही. हे पहिलं काम करतील,लाडकी बहीण योजना बंद करतील.एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला.लाडकी बहीण योजना सुरुच आहे. लाडक्या बहिणींनो चिंता करू नका.जोपर्यंत तुमचा देवाभाऊ, तुमचे शिंदे भाऊ याठिकाणी आहेत.तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे.पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहि‍णींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती दीदी बनवा..लखपती दीदी..",असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते भाजपच्या चेंबूर येथील प्रचारसभेत बोलत होते. 

फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर केली टीका

फडणवीस ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हणाले, "उद्धवजी आणि राज ठाकरेची नाशिकमध्ये गेले होते. ते मुंबईत सभाच घेत नाहीत. नाशिकमध्ये सभा घेतला. नाशिकच्या ऐवजी ते मुंबईवर बोलले. नाशिकवर बोललेच नाहीत.नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार,देवयानी ताई फरांदे आणि राहुल नार्वेकर यांच्यावर बोलले. यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही.25 वर्षात दाखवण्यासारखं काहीच नाही.आपल्या आशा, आकांशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका आम्हाला हवी आहे.केवळ कोणाला महापौर बनवायचं आहे यासाठी नाही,केवळ कोणाला नगरसेवक बनवायचं आहे यासाठी नाही, तर या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी ही महानगरपालिका आम्हाला हवी आहे".

नक्की वाचा >> अंबरनाथमध्ये भाजपला धोबीपछाड! अजित पवार गटालाही धक्का, शिंदेंची स्मार्ट खेळी, किती नगरसेवक फोडले?

मुंबई शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर फडणवीस काय म्हणाले?

मुंबई शहराच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत फडणवीस म्हणाले, ठमुंबई शहर वाढतंय. पिण्याच्या पाण्याची गरज वाढतेय. गेले इतके वर्ष गारगाईचा प्रकल्प ज्यातून 500 एमएलडी पाणी मुंबईला मिळू शकतं. सगळ्यात स्वस्त प्रकल्प..सगळ्या ग्रेडिएंटनी पाणी येणार. पण 20 वर्ष या प्रकल्पाचं कामच पुढे जात नव्हतं. मला सांगताना आनंद वाटतो, कारण त्यातील अडचणी मी समजून घेतल्या आणि त्या दूर केल्या. गारगाईचा दोन वेळा नामंजूर झालेला प्रकल्प त्याला वनविभाग आणि पर्यावरणाची परवानगी आणली. त्याचं टेंडर काढलं. त्याचं काम सुरु केलं. आता 500 एमएलडी पाणी मुंबईला मिळेल.

नक्की वाचा >> Mumbai News: बाईईई! मुंबईतील 78 मजली Trump Tower च्या फ्लॅटचं भाडं किती? किंमत पाहून गावीच जाल

"त्या माध्यमातून पुढचे 20-25 वर्ष मुंबईत पाण्याची टंचाई कधीही पाहायला मिळणार नाही.अशा पद्धतीने आपण हे काम केलं आहे. इंदू मिलचं स्मारक..भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या ठिकाणी महापरीनिर्वाण झालं,त्या ठिकाणी जुन्या सरकारनं इंचभर जागाही दिली नव्हती. आठवले साहेब आम्ही मोदीजींकडे गेलो. 3600 कोटी रुपयांची जागा दिली आणि आज इंदू मिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे. आज आपण खऱ्या अर्थाने मुंबईचा चेहरा बदलण्याचा काम आपण करतो आहे", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.