'पराभव दिसत असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग' फडणवीसांनी दिलं आरोपांना चोख उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

 Devendra Fadnavis On Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंंत्री झाले. त्यानंतरही पराभूत महाविकास आघाडीचे निवडणूक निकालावरुन आरोप सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले फडणवीस?

या आरोपांवरील सर्व उत्तरं निवडणूक आयोगानं दिलेली आहेत. किती मतदार वाढले? ते कुठे वाढले ? ते कसे वाढले? निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. आता राहुल गांधींची जी तयारी चाललीय ती दिल्लीमध्ये प्रचंड मोठा त्यांचा पराभव होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत करुन घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीही मिळणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

( नक्की वाचा : Delhi Exit Poll : दिल्लीमध्ये 'AAP' ची पुन्हा सत्ता की भाजपाचं 27 वर्षांनी कमबॅक? पाहा काय आहे अंदाज )

जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते! (एकच जोक सतत सांगितला तर त्यावर हसू नये) असं ट्विट करतही मुख्यमंत्र्यांनी या विषयावर राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

Advertisement

राहुल गांधी यांचे आरोप काय?

त्यापूर्वी राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी 39 लाख मतदार वाढले. पाच वर्षात 32 लाख मतदार तर पाच महिन्यात 39 लाख कसे ? असा प्रश्न त्यांनी विचारला. मतदार यादीत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र सरकारच्या मतानुसार राज्याची लोकसंख्या 9 कोटी 54 लाख इतकी आहे. निवडणूक आयोगाच्या मते 9 कोटी 70 लाख मतदार आहेत, असा आरोपही राहुल यांनी केला. विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्या नाव आणि पत्त्य़ांसह आम्हाला द्या. निवडणूक आयोगाला 3 मोठे राजकीय पक्ष यादी मागत आहेत. आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही ती आयोगाची जबाबादरी आहे, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपाची वाढली असा दावाही त्यांनी केला. 

Advertisement