मुख्यमंत्र्यांचे सचिव महायुतीत मिठाचा खडा टाकणार ? चक्रव्यूह भेदण्यासाठी दुसरा 'अभिमन्यू' तयार

आता महायुतीमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर हे मिठाचा खडा टाकणार की काय अशी स्थिती पहावयास मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
नांदेड:

योगेश लाठकर

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. महायुती असो किंवा महविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांचे बडे नेते आघाडी युती होणारच असे सांगत आहेत. मात्र आता महायुतीमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर हे मिठाचा खडा टाकणार की काय अशी स्थिती पहावयास मिळत आहे. निमित्त आहे मुखेड विधानसभेचे.  शासन म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी ही व्याख्या आहे. पण अलीकडच्या काळात आधी प्रशासनात काम करायचे अन् मग शासन व्हायचे असा ट्रेण्ड आहे. अनेक अधिकारी हे सेवानिवृत्ती नंतर निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव अभिमन्यू पवार यांनी आमदारकी पटकवली होती. त्यांच्यात पावलावर पाऊल टाकत बालाजी खतगावकरही आमदार होण्याचे स्वप्न पाहात आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत एका अभिमन्यूने राजकीय चक्रव्यूह भेडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे अभिमन्यू पवार हे सचिव होते. त्यावेळी त्यांना फडणवीस यांनी औसा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. आधी तयारी ही करून गेतली होती. त्यानंतर अभिमन्यू पवार थेट विधानसभेत पोहोचले. सचिवाचे आमदार झाले. आता 2024 चा निवडणुकीत त्याचीच री ओढण्याचा चंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवांने बांधला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर हे मुखेड विधानसभेत नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी या मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासून संपर्क वाढवला आहे. त्यांनी काल 300 वाहनांच्या ताफ्यासह महापरीवर्तन रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने आमदार होणारच असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केलाय. मुखेड मतदार संघ हा भाजपचा मतदार संघ आहे. इथे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. अशा वेळी खतगावकर इथे तयारी करत असल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.  त्यांनी या मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासून संपर्कही वाढवला आहे. मतदार संघात त्यांचे अनेक बॅनर्स होर्डिंग्ज पहावयास मिळतात. अनेक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते.  काल 300 वाहनांच्या ताफ्यासह मुखेड ते मशनेर अशी महापरीवर्तन रॅली काढली. या रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीने फुले टाकणे झाले. या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. माध्यमांशी बोलताना मी दुसरा अभिमन्यू होणार अन्  मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आमदार होणारच असा विश्वास खतगावकर यांनी व्यक्त केलाय.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा

मुखेड विधानसभा मतदारसंघात मागील 10 वर्षांपासून भाजपचे डॉ तुषार राठोड हे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुखेड मतदार संघातून भाजपला लीड मिळाले होते. जिथे ज्या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला हे युतीचे सूत्र आहे, असे भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांनी सांगितले. पण एकनाथ शिंदे यांचे सचिव विनाकारण हवा करत आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केली. शिवाय याबाबत आपण पक्षाकडे तक्रार केल्याचं ही स्पष्ट केले. मतदार संघात आपणच महायुतीचे उमेदवार असू असा दावाही त्यांनी केला.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला. पण मुखेड विधानसभेतून  भाजपला सुमारे पाच हजार मतांनी आघाडी मिळाली होती. तालुक्यातील बाजार समिती नगर पालिका अश्या संस्थांवर भाजपचा ताबा आहे. जिथे ज्या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला हे युतीचे सूत्र आहे. मग या सूत्राने मुखेडची जागा भाजपची असा दावा भाजपचा आहे.  पण एकनाथ शिंदे यांचे सचिव विनाकारण वातावरण कलुशित करत आहेत. युती धर्माचे पालन करत नाहीत याची तक्रार पक्षाकडे केल्याचं आमदार डॉ तुषार राठोड म्हणाले. बालाजी खतगावकर हे मूळचे देगलुर विधानसभा मतदार संघातील आहेत  पण त्यांची लुडबुड मुखेड मतदार संघात होत आहे असेही भाजपचे म्हणणे आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - गौतमी पाटीलच्या मनात कोणी केलं घर? थेट उत्तर देत चाहत्यांना केलं...

बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहे. त्यामुळेच हा मतदार संघ भाजपचा असतानाही खतगावकर निवडणूक लढवण्यावर सध्यातरी ठाम आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सचिवांना फुस तर लावली नाही ना अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे. मुख्यमंत्र्यांचा एक सचिव आमदार झाला. दुसरा सचिव आमदार होण्याची स्वप्न पाहात आहे. यामुळे युतीत या निमित्ताने बिघाडीतर होणार नाही ना याची चर्चा आता रंगू लागली आहे.  ज्या पक्षाकडे तो विधानसभा मतदार संघ नसतो त्या ठिकाणी आपला माणूस अपक्ष म्हणून उभा करायचा अन् तो निवडून आला की त्याला सत्ता स्थापनेसाठी आपल्या पक्षाचा सहयोगी सदस्य करून घ्यायचा प्रकार मागील काही वर्षापासून सर्रास सुरू आहे. मुखेडची जागा ही महायुतीत भाजपच्या वाट्याला असली तरी बालाजी खतगावकर अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे वर्तमान आहे. बालाजी खतगावकर  यांनी अपक्ष निवडणूक लढवली अन् समजा ते विजयी झाले तर ते शिंदे गटाचे सहयोगी सदस्य होतील हे भविष्य असेल.