'फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले' बड्या नेत्याचा बडा आरोप

मी आजारी असताना देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आपले घर फोडले असा आरोप बड्या नेत्याने केला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
धाराशीव:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. निवडणुकी आधी दोन पक्ष फुटले. राजकीय घरांमध्ये फुट पडली. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मी आजारी असताना फडणवीसांनी दबाव टाकून आपले घर फोडले असा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभेच्या तोंडावर मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा सुनिल चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 मधुकरराव चव्हाण हे पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. सध्या त्यांचे वय 90 वर्षाचे आहेत. सध्या मतदार संघात त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. यावेळी येवती इथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की फडणवीसांनी दबाव टाकून आपले घर फोडले. याचे पाप त्यांना कधी ना कधी फेडावेच लागेल. असे विधान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकी वेळी आपण आजारी होतो. त्यावेळी सुनील चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले गेले असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर पक्षात आपल्याकडे संशयाने पाहीले जात होते असेही चव्हाण म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मविआत पुढचा मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने थेट सांगितलं, आघाडीत बिघाडी होणार?

धाराशिव तालुक्यातील येवती येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री चव्हाण यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाचा खुलासा केला आहे. चव्हाण म्हणाले भाजप काँग्रेसने लावलेले ग्रामीण भागाच्या विकासाचे रोपटे तोडण्याचे काम करत आहे. तसेच आमचे घर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. आम्हाला अस्वस्थ करून आमची बदनामी केली. याचे दुःख आम्हाला आहे. त्यामुळे त्यांनी केलेले हे पाप कधी ना कधी त्यांना फेडावे लागेल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'लाडक्या बहिणी'चा रात्रभर बँके बाहेर मुक्काम, नंदुरबारमध्ये काय घडलं?

चव्हाण पुढे म्हणाले,  मी 90 वर्षाचा तरुण पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो. खोंडावर  पेरणी व्यवस्थित होत नाही. असं सांगत आमदार राणा जगजीत सिंह यांच्यावरही त्यांनी टीका केली. चव्हाण म्हणाले की मी 22 व्या वर्षी राजकारणात आलो. पूर्वी देखील हेवेदावे आणि गटबाजी होती. त्यावेळी विचारांची लढाई होती. मात्र आज घरात घुसून मारायचे प्रकार वाढले आहेत. ही कोणती संस्कृती आहे. मी 1985 साली उस्मानाबाद विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिकिटावर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उभा राहिलो.आम्ही कधी गुंडगिरी केली नाही. मात्र गुंडगिरीच्या विरोधात आम्ही ताकद वापरली. मात्र त्यावेळी माझा अवघ्या 4000 मतांनी पराभव झाला. 

ट्रेंडिंग बातमी -  कोविड XEC ने टेन्शन वाढवलं, 27 देशांमध्ये फैलाव; काय आहेत लक्षणे?

तुळजापूर तालुक्याची ओळख दगड व कुसळी तालुका म्हणून होती. ठिकठिकाणी तलाव बांधून पाणी अडविल्यामुळे संपूर्ण तालुका हिरवागार झाला आहे. गोरगरिबांचा विकास कामाला पडणे हे काम मी सत्तेत असताना केले असा दावाही त्यांनी यावेळी केला. आता देखील त्यांच्या मदतीला या वयात धावून जात आहे. पुढच्या काळातही जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मधुकर चव्हाण यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे सर्वात जेष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. तुळजापूरची जागा म्हणजे काँग्रेसची हक्काची जागा समजली जात होती. काँग्रेसच्या प्रचाराचा नारळही तुळजापूरमधूनच फुटत होता. मात्र मागिल निवडणुकीत काँग्रेसला आणि मधुकर चव्हाण यांना पराभव स्विकारावा लागला होता.