पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल

एकीकडे पूरस्थितीमुळे सर्व सामान्य जनता हैराण आहे. अशा वेळी खासदार मात्र स्टंटबाजी करत आहेत, अशी टिका त्यांच्यावर होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना स्टंटबाजी केली आहे. हा स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळे काँग्रेस खासदार पडोळे यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. एकीकडे पुरस्थितीमुळे सर्व सामान्य जनता हैराण आहे. अशा वेळी खासदार मात्र स्टंटबाजी करत आहेत, अशी टिका त्यांच्यावर होत आहे. प्रशांत पडोळे हे भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेस खासदार आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भंडाऱ्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे आले होते. त्यावेळी त्यांनी गाडीच्या बोनेटवर बसत, स्टंटबाजी केली आहे. त्याचा व्हिडीओ त्यांच्या कार्यकर्त्यांनीच काढला आहे. नंतर हा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. या व्हिडीओत खासदारांची गाडी दिसत आहे. ज्या भागातून गाडी येत आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. अशा स्थितीत खासदार गाडीच्या बोनेटवर बसले आहेत. त्यानंतर ही गाडी भरधाव वेगाने त्या पाण्यातून पुढे जात आहे. त्याचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - एमआयएम मविआचं चाललंय काय? दानवे-जलील यांचे दावे प्रतिदावे

दोन दिवस भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे जनता त्रस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते.  त्यावेळी त्यांनी गाडीच्या बोनेटवर बसून ही स्टंटबाजी केली आहे. त्याचा रील ही बनवण्यात आला आहे. एकीकडे पूर परिस्थितीने नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे खासदार रिल बनवण्यात दंग आहेत. त्यामुळे लोकांनी रोष व्यक्त केला आहे. विरोधकांनीही त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लिव्ह इनमधल्या प्रेयसीला मारलं, रिक्षात टाकलं, आईच्या घरासमोर सोडलं, पुढे काय झालं?

डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांचा पराभव केला होता. सुनिल मेंढे हे विद्यमान खासदार होते. त्यांचा त्यांनी पराभव केला. एकेकाळी भंडारा गोंदिया हा काँग्रेसचा गड होता. पण मोदी लाटेत हा गड कोसळला होता. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भंडाऱ्यात आपला खासदार निवडून आणला.  

Advertisement