'आंबेडकरांविरुद्ध काँग्रेसनं सतत लबाडीने...' अमित शाहांना घेरणाऱ्या विरोधकांवर PM मोदींचा प्रहार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या  (Home Minister Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरावरील वक्तव्यानं सध्या राजकारण तापलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या  (Home Minister Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरावरील वक्तव्यानं सध्या राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षांनी या विषयावर संसदेत जोरदार हल्ला केलाय. विरोधी पक्षांच्या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शाह यांचा बचाव केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर लिहिलं आहे की, 'काँग्रेस आणि त्यांच्या कुजलेल्या इकोसिस्टमला वाटते की त्यांचे खोटे अनेक वर्षांचे दृष्कृत्य लपवू शकते. पंतप्रधानांनी पुढं लिहलं की, विशेषत: डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसनंच जो अपनान केला आहे, तो ते लपवू शकतील, असा त्यांचा विचार असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.

भारतीय नागरिकांनी हे सतत पाहिलं आहे. एका कुटुंबाचं नेतृत्त्व असलेल्या पक्षानं डॉ. आंबेडकरांचा वारसा मिटवण्यासाठी SC/ST समुदायांचा अपमान करण्यासाठी शक्य असलेल्या सर्व घाणेरड्या चालींचा वापर केला आहे.'

अमित शाह काय म्हणाले होते?

अमित शाह यांनी मंगळवारी संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या चर्चेला राज्यसभेत संबोधित केले. त्यावेळी शाह म्हणाले की, 'बीआर आंबेडकरांचं नाव घेणं आता एक फॅशन झाली आहे. ही आता फॅशन झालीय. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... इतकं नाव जर देवाचं घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळेल. 

Advertisement

( नक्की वाचा : अमित शाह म्हणाले की मोदी आणि संघानं सांगितलं? आंबेडकरांवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल )
 

पंतप्रधानांचे प्रमुख मुद्दे

पंतप्रधान म्हणाले की, आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी घराणेशाहीच्या नेतृत्वाखालील पक्ष कसा प्रत्येक घाणेरडा डाव खेळला हे लोकांनी अनेकदा पाहिले आहे.
काँग्रेस आणि त्यांच्या कुजलेल्या इकोसिस्टमला असे वाटत असेल की त्यांची चूक, विशेषत: आंबेडकरांचा अपमान, लबाडीने झाकून टाकता येईल, तर त्यांची घोडचूक आहे.
अमित शहांचा बचाव करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गृहमंत्र्यांनी राज्यसभेत आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला.

Topics mentioned in this article