विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष गुंतले आहे. ही तयारी सुरू असताना अनेक ठिकाणी मित्र पक्षांमध्येच धुसफूस दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातही तिच स्थिती आहे. इथे महायुतीमध्ये धुसफूस असल्याचे समोर आले आहे. इथे तर महायुतीतला वाद इतका टोकाला गेला आही की युतीचा धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? असा प्रश्न करत माकड चाळे बंद करा असा इशारा शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे. हा इशारा त्यांनी जिल्ह्यातल्या भाजप नेत्यांना दिला आहे. तर दुसरीकडे कर्जतमध्येही शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शहकाट शहाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे रायगडमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच झाला. या मेळाव्याला जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी संबोधीत केले. यावेळी त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर जोरादार टिका केली. अलिबाग मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. तिथले विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत. असे असतानाही त्या मतदार संघात भाजपचे लोक विद्यमान आमदार म्हणून त्यांचे बॅनर लावत आहेत. हे युती धर्माला शोभत नाहीत. त्यामुळे हे माकड चाळे तातडीने बंद करावे, नाही तर आम्हाला युती धर्म तोडावा लागेल असा इशाराच त्यांनी दिला आहे.
अलिबाग विधानसभेमध्ये सध्या शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत. असे असताना तिथे भाजपचे दिलिप भोईर हे पोस्टर बाजी करत आहेत. अशा लोकांवर तातडीने कारवाई करा. त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. जर असे केले नाही तर पेण विधानसभेत शिवसेनेची चाळीस हजार मते आहेत. त्यामतदार संघात आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. पनवेलमध्ये ही शिवसेनेची ताकद आहे याची आठवण त्यांनी करून दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला
एकीकडे शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला असताना कर्जतमध्येही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. यामतदार संघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी शुड्डू ठोकला आहे. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यामुळे थोरवे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यात अजित पवारांनी घारे यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. त्यामुळे इथला वादही उफाळून आला आहे.