दादा भुसें विरोधात कट्टर समर्थकानेच थोपटले दंड, निकाल फिरणार?

बंडूकाका बच्छाव हे एकेकाळचे मंत्री दादा भुसे यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र त्यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मालेगाव:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातले वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदार संघ मंत्री दादा भूसे यांचा मतदार संघ आहे. त्यांनी या मतदार संघातून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. सध्या ते ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. या मतदार संघात दादा भूसे यांचा कोणत्याही स्थितीत पराभव करायचा असा चंग उद्धव ठाकरे गटाने बांधला आहे. त्यासाठी अद्वय हिरे यांना ताकद दिली जात आहे. त्यात आता दादा भूसे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक समजले जाणारे बंडूकाका बच्छाव यांनीही भूसे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे भूसे यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मालेगाव बाह्य हा शिवसेनेचा गड मानला जातो. दादा भूसे या मतदार संघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी या मतदार संघात एकतर्फी विजय मिळवला आहे. शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर दादा भूसे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे या मतदार संघाचे गणित आता बदलले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात एकेकाळचे त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते बंडूकाका बच्छाव यांनी दंड थोपटले आहेत. बच्छाव यांनी मालेगावमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 

ट्रेंडिंग बातमी - मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?

दादा भुसे आपल्याला डमी उमेदवार म्हणत आहेत. असा आरोप बच्छाव यांनी केला.  मात्र मी व तत्कालीन शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीमुळे आज दादा भुसे मंत्री झाले आहेत याची आठवण बच्छाव यांनी या निमित्ताने करून दिली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यां बरोबर खास आहिराणी भाषेतून संवाद साधला. दादा भुसे यांनी पक्ष नेतृत्वाशी गद्दारी करीत गुवाहाटी वारी केली. ते काय मला मॅनेज करतील असा सवाल बच्छाव यांनी व्यक्त केला. शिवाय आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ट्रेंडिंग बातमी - युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा

दरम्यान या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून अद्वय हिरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्वय हिरे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून ताकद दिली जात आहे. अशा वेळी बच्छाव यांनी अद्वय हिरे यांचाही समाचार घेतला. बच्छाव हे सध्या ठाकरे गटात आहेत. मात्र त्यांनी घेतलेल्या थेट भूमीकेमुळे मालेगाव बाह्य मतदार संघातून तिरंगी लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.  

ट्रेंडिंग बातमी - गौतमी पाटीलच्या मनात कोणी केलं घर? थेट उत्तर देत चाहत्यांना केलं...

बंडूकाका बच्छाव हे एकेकाळचे मंत्री दादा भुसे यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र त्यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.  शिवसेना व बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून बच्छाब यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून मतदार संघात मोठे संघटन उभे केले आहे. त्यामुळे भुसे यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय जुने सरकारी असल्याने बच्छाव यांनी दादा भूसे यांची शक्तीस्थाने आणि कच्चे दुवे चांगलेच माहित आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत याच गोष्टी भूसे यांच्यासाठी अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे.