Sheesh Mahal Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेसह भारतीय जनता पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. दिल्लीतल्या अशोक विहारमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही सूचक टीका केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'देशाला हे चांगलं माहिती आहे की, मोदींनी कधी स्वत:साठी घर बनवलं नाही. पण, गेल्या 10 वर्षात चार कोटींपेक्षा जास्त गरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. मी देखील एखादा शीशमहाल बनवू शकलो असतो, पण माझ्यासाठी देशवासियांचं पक्क घरं हेच स्वप्न होतं. '
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत शीशमहालचा उल्लेख करत भाजपाच्या निवडणूक प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. अर्थात दिल्लीच्या राजकारणात शीशमहालाचा मुद्दा नवा नाही. यापूर्वी देखील या विषयावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य करण्यात आलं आहे. आहे.
कसा आहे शीशमहाल?
शीशमहाल म्हणून उल्लेख होत असलेली वास्तू ही अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांचे अधिकृत शासकीय निवास्थान होते. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर हे घर रिकामं केलं. त्यानंतर PWD नं शीश महालातील सामानांची यादी प्रसिद्ध केली. ती यादी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
'जनसत्ता'मधील वृत्तानुसार, केजरीवाल यांनी या घरात 19.5 लाख रुपयांचे स्मार्ट एलईडी लाईट्स लावले होते. त्याचबरोबर घरामध्ये सेन्सर आणि रिमोट कंट्रोल सिस्टमवर चालणारे एकूण 80 पडदे लावण्यात आले होते. त्याची किंमत 4 ते 5.6 कोटी इतकी आहे.
( नक्की वाचा : Video : 'तो' फक्त शिवाजी महाराजांचा मान! संतांसमोर CM फडणवीसांच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं )
या वृत्तानुसार घरामध्ये 64 लाख रुपयांचे 16 TV लावण्यात आले होते. 10 लाखांचा रिक्लाईनर सोफा, 9 लाखांचे ओव्हन, 36 लाखांचे सजावटीचे खांब लावण्यात आले होेते. इतकंच नाही तर 10 ते 12 लाख रुपयांचे कमोड देखील केजरीवाल यांनी घरात लावले होते, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.
दिल्ली भाजपा नेते वीरेंद्र सचदेवा यांनी देखील एक व्हिडिओ X वर पोस्ट केला होता. त्यामध्ये देखील त्यांनी शीशमहालामध्ये कोणत्या वस्तू आहेत याची यादी सांगितली आहे. सचदेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शीश महालात 4 लाखांची मसाज चेयर या बंगल्यात आहे. त्याचबरोबर या घरातील स्वच्छतेसाठी 15 कोटींची कामं झाली आहेत. घरातील 2 फ्रिजची किंमत 9 लाख रुपये, तीन हॉट वॉटर जनरेटरची किंमत 22.5 लाख रुपये आहे असा दावा सचदेवा यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.