फडणवीसांनी समजवला राजकारणातील 'डकवर्थ लुईस'चा नियम, मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियातील मुंबईकर शिलेदारांचा शुक्रवारी (5 जुलै) विधिमंडळात सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी क्रिकेटचा संदर्भ देत राजकीय फटकेबाजी केली. 

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियातील मुंबईकर शिलेदारांचा शुक्रवारी (5 जुलै) विधिमंडळात सत्कार करण्यात आला.  टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल या खेळाडूंसह बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसंच सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी क्रिकेटचा संदर्भ देत राजकीय फटकेबाजी केली. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हाच कॅप्टन विजयापर्यंत नेऊ शकतो

'कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दु:खही दिलं. आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देऊन खूप मोठा आनंद दिला त्याचदिवशी T20 मधून रिटायरमेंट घेऊन आपल्याला  दु:ख दिलं. वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टनमध्ये कपिल देव आणि धोनीनंतर रोहित शर्मा आहेत. आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे. रोहित शर्माची प्रेस कॉन्फरन्स पाहिली पाहिजे, म्हणजे कमीत कमी बोलून बॉडी लँग्वेजमधूनही उत्तर देता येईल हे रोहितकडून शिकता आलं पाहिजे,' असं फडणवीस यांनी सांगितलं.

रोहित शर्मा हा T20 मधला जगातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्मानं क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. पण, कॅप्टन म्हणून त्यानं टीमचा मिळवलेला विश्वास हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांच्या कोणत्याही टीम मेंबरला विचारलं, आपण अनेक जण त्यांच्या मुलाखती पाहात असतो. त्यावेळी ते ज्या आदरानं आणि प्रेमानं रोहित शर्माचं नाव घेतात. मला असं वाटतं की कुणालाही जर लीड करायचं असेल तर हे शिकलं पाहिजे. कधी कठोर वागून देखील पण आपल्या टीम मेंबरच्या मनाचा विश्वास की आमचा कॅप्टन हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो. हा आमचा कॅप्टन आहे हा आमचा कर्णधार आहे, हे आपल्याला त्यांच्या एकूण सगळ्या व्यवहारात पाहायला मिळतं, असं फडणवीलस यांनी सांगितलं. 

Advertisement

( Video : '....तर घरी बसवला असता' सू्र्याच्या ऐतिहासिक कॅचवर रोहितचा सिक्सर )
 

मुंबईकरांसाठी मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडं मुंबईकर क्रिकेट फॅन्ससाठी मोठी मागणी केली.  आपलं ऐतिहासि वानखेडे स्टेडियम आहेच. अतिशय सुंदर स्टेडियम आहे. आशिषजी आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची आवश्यकता आहे. येत्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) बीसीसीआय (BCCI) यांना जी काही मदत लागेल, ते मुख्यमंत्री या ठिकाणी करतील,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

'वानखेडेची सर कोणत्याही स्टेडियमला येऊ शकत नाही. ते ऐतिहासिक आहे. तरीही मुंबईला आधुनिक एक लाख लोकं मावतील अशा प्रकारचं स्टेडियम मुंबईमध्ये आपण सर्वांनी मिळून करावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो,' अशी मागणी  फडणवीस यांनी केली.

( नक्की वाचा : PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? )
 

राजकारणातील डकवर्थ लुईस

देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणाच्या शेवटी राजकारणातील डकवर्थ लुईस नियम देखील समाजवून सांगितला. 'आमच्याकडंही डकवर्थ लुईसचा नियम आहे. कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे अ‍ॅव्हरेजवर कुणाचा विजय होईल हे सांगता येत नाही.' असं फडणवीस यावेळी म्हणाले. 'हे जरी असलं तरीदेखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत. तुम्ही बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय तुम्ही तो जिंकवलाय हा भाव सर्वांच्या मनात आहे,' असं फडणवीस यांनी भाषणच्या शेवटी सांगितलं.

Advertisement