संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Aklun Nagarparishad Election 2025 : अकलूज नगरपालिका निवडणुकीत भाजपाच पराभव करत खासदार धेर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारली. मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत भाजप विरोधात रणशिंग फुंकलं होतं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 8 पालिकांवर भाजपला यश मिळालं नाही. इतर मित्र पक्षांनी या पालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर खासदार धेर्यशील मोहिते पाटील यांनी धुरंधर चित्रपटातील डायलॉग बोलून भाजपला डिवचलं आहे. "घायल हूं..इसलिये घातक हूं",असं मोहिते पाटील म्हणाले.
अकलूज नगरपरिषदेतील एकूण 13 प्रभागात 26 उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 22 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपचे फक्त 4 उमेदवार या निवडणुकीत जिंकले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा आडगळे (राष्ट्रवादीशरदचंद्र पवार पक्ष) 2793 मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार पूजा कोथमीरे यांचा पराभव झाला.
धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजप राजकीय संघर्ष पेटला
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी धुरंधरचे डायलॉगबाजी करून अकुलजमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. त्यामुळे धुरंधर चित्रपटाचटी क्रेझ अकलूजच्या राजकीय पटलावरही दिसून आली. अकलूज पालिका निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटला होता. भाजपकडून माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूजची निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची केली. सभेंच्या माध्यमातून अकलूज मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा राबवली होती.खासदार धैर्यशीर मोहिते पाटील यांनी शेवटची एकच सभा घेऊन संपूर्ण निवडणूक हाताळली.
नक्की वाचा >> Navi Mumbai: अजित पवारांना मोठा धक्का; CIDCO माजी संचालकांनी घेतला मोठा निर्णय? एका फोटोमुळे राजकारण तापणार
धुरंधरची डायलॉगबाजी करून विरोधकांवर निशाणा
सोशल मीडियावर धुरंधरच चित्रपटाच्या डायलॉगचे रिल्स आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. धुरंधर चित्रपटाचे पडसाद राजकारणातही उतरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धुरंधरचे डायलॉग बोलून नेतेमंडळी ऐकमेकांवर निशाणा साधत आहेत. अकलुज येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनीही धुरंधरच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. " घायल हूं..इसिलीए घातक हूं", असं म्हणत मोहित पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.