मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद विधीमंडळात उमटले. या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरताना मंत्री धनंजय मुंडे यांचीही कोंडी केली. विरोधकां बरोबरच सत्ताधारी आमदारांनीही या खूनमागे कोण मास्टरमाईंड आहेत त्यांचा शोध घेतला पाहीजे अशी मागणी केली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षिरसागर यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याचे कोणाशी संबध आहेत. हा कोणाचा कार्यकर्ता आहे? हत्ये आधी त्याचे कोणाशी बोलणे झाले होते? असा प्रश्न उपस्थित केले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी ही थेट उत्तर दिले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी असल्याचा संशय आहे. हा वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. या हत्येतला मेन माणून वाल्मिकी आहे. मग त्याच्यावर अजून ही का बोट उठत नाही. तो उजळ माथ्याने बीडमध्ये फिरतोय. त्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. त्यात पालकमंत्र्यांचे पान ज्याच्या शिवाय हलत नाही तो म्हणजे वाल्मिक कराड अशा आशयाचे ते व्हिडीओ आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे या कराडला कोणत्या मंत्र्याचे संरक्षण आहे असा प्रश्न आव्हा यांनी उपस्थित केला.
तर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांनीही हा प्रश्न उपस्थित केला. या वाल्मिक कराडचे फोन तपासा. हत्ये आधी तो कोणा बरोबर बोलत होता. त्याला कोणी काय आदेश दिले, हे समोर आले पाहीजे. आम्ही आमदार आहोत पण आम्हाला एक बॉडीगार्ड दिला जातो. पण या वाल्मिक कराडला दोन दोन बॉडीगार्ड कसे काय दिले जातात असा प्रश्नही क्षिरसागर यांनी उपस्थित केला. त्याच कराडचे सीडीआर तपासा सर्व गोष्टी समोर येतील असंही ते म्हणाले. तर भाजप आमदार नमिता मुंदडा यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. खून होवून बरेच दिवस झाले. पण सर्व आरोपी अजूनही अटक झालेले नाहीत. जिल्ह्यात भितीचे वातावरण आहे. अशा वेळी त्यांना अटक होवून कडक कारवाई केली गेली पाहीजे अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य, थेट महायुतीवर निशाणा
एकीकडे आरोपाची झोड उठली आहे. वाल्मिक कराड यांचा थेट संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जात आहे. त्यावर धनजंय मुंडे हे पहिल्यांदाच बोलले आहेत. ते म्हणाले. होय वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत. हे मी नाकारणार नाही. पण कुणी जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहीजे. त्यासाठी हवी ती चौकशी समिती नेमा. पण आपल्या बरोबर फोटो काढल्यानंतर त्यांच्या खाजगी जिवनात ते काय करतात हे आम्हाला कसे माहित असेल असं बोलत मुंडे यांनीही हात झटकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या हत्ये प्रकरणी पहिल्याच दिवशी कारवाई झाली आहे. त्यातले काही जण अजूनही फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पथकं तयार केली आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री अधिक काही जे आहे ते बोलतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधव- विखे पाटील यांच्यात खडाजंगी, विधानसभेत काय झालं?
दरम्यान या प्रकरणी विरोधक आता आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने तर या प्रकरणी सरकार गंभीर नाही असा आरोप करत विधानसभेत सभात्याग केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हा विषय लावून घरला होता. याला बीड जिल्ह्यातील भाजप आमदारांचीही त्यांना साथ मिळाला. त्यात आता धनंजय मुंडे यांनी हो तो आपल्या जवळचा आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे यावरून सरकारची आणखी कोंडी होवू शकते. याबाबतच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्तरातून अनेक मुद्दे स्पष्ट होवू शकतील.