Suresh Dhas :'1 रुपयाचेही काम न करता 73 कोटींची बोगस बिले उचलली', धनंजय मुंडेंवर थेट घाव

धनंजय मुंडे (Dhananjay Munde Maharashtra Minister) हे पालकमंत्री असताना परळी आंबेजोगाई भागात तब्बल 73 कोटी 36 लाखांची बोगस बीले दाखवून रक्कम लाटण्यात आली, असा आरोप धस (Suresh Dhas New Allegation on Dhananjay Munde) यांनी केलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

Suresh Dhas Corruption Allegations on Dhananjay Munde : भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील टीकेची धार आणखी वाढवली आहे. धस यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. मुंडे बीडचे पालकमंत्री त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप धस यांनी केला आहे. मुंडेंनी पालकमंत्रिपद हे भाड्याने दिलं होतं, असा आरोप करत धस यांनी मुंडे यांची काही प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. धस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी आरोप केला की धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना परळी आणि आंबेजोगाईमध्ये एक रुपयाचेही काम न करता बोगस बिलं दाखवून 73 कोटी हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी याबाबत तारखेसह कुठल्या कामात किती बोगस बिलं दाखवून पैसे उचलले गेले हे मांडण्याचा आजच्या पत्रकार परिषदेत प्रयत्न केला. धस यांनी केलेल्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचा पाय आता आणखी खोलात जाण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2021 ते 2022 या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी बीडचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे होते. कोरोनाच्या काळात परळी, आंबेजोगाईमध्ये कोणतेही काम नकरता खोटी बिलं दाखवून कोट्यवधी रुपये उचलले गेले होते असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 30-12-2021 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई यांच्याकडे 2 कोटी 31 लाखा बोगस बिलाच्या सहाय्याने उचलण्यात आले होते. तर कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडून 10 कोटी 98 लाखांची रक्कम घेतली होती. आंबेजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 6 कोटी 59 लाख रूपये, तर बीड जिल्हा परिषदेमार्फत 16 कोटी 48 लाख रूपये कोणतेही काम न करता उचलले होते असा आरोप धस यांनी केला आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Big news: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, दिलं 'हे' कारण

जवळपास 37 कोटी 70 लाख रूपये एकाच वेळी खोट्या बिलाच्या सहाय्याने उचलण्यात आले होते. त्यावेळी संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता होते. हेच परळीतही डेप्युटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी जिल्हापरिषदेत वळवला जात होता. नंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला जात होता असे धस यांचे म्हणणे आहे. त्यानंतर बोगस बिलाच्या माध्यमातून तो लुटला जात होता असं  धस यांचे म्हणणे आहे. या कालावधीत धनंजय मुंडे हेच बीडचे पालकमंत्री होते. हे 37 कोटी रुपये 25 जून 2022 ला उचलण्यात आले होते आणि विशेष म्हणजे एक ही रुपयाचे काम न करता हा पैसा लाटण्यात आला होता असा धस यांनी आरोप केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Tiger Urine: बाटलीत विकली जात होती वाघाची लघवी, किंमत 600 रुपये, हैराण करणारं सत्य आलं समोर अन्...

पुढे 2023 मध्येही धनंजय मुंडेच बीडचे पालकमंत्री होते. त्यावेळी आंबेजोगाईतील रस्ते कामासाठी जवळपास 16 कोटी 20 लाखाचा निधी खोट्या बिलाच्या माध्यमातून उचलण्यात आला. 59 रस्त्यांची कामं केली जाणार होती. त्यात परळी पूस-बरदापूर या रस्त्यासाठी अतिरीक्त 6 कोटीचे काम मंजूर करून आणण्यात आले होते. क्षेत्रीय अधिकारी यांनी याची चौकशी केली असता या रस्त्यावर दोनदा बिलं उचलले असल्याचे समोर आले होते. पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, किंवा कोणावर ही कारवाई झाली नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News: तरुणाच्या नको त्या ठिकाणी बाम लावला, नंतर Video काढला, कारण ऐकून हैराण व्हाल

बीड जिल्हाधिकाऱ्यांनी परळी मतदार संघातल्या कामाच्या जवळपास 57 प्रशासकीय मान्यता रद्द केल्या होत्या. पण तसं असतानाही जवळपास 14 कोटी 43 लाख 45 हजारांची बिलं आका उचलून मोकळा झाला होता. प्रशासकीय मान्यता रद्द झाली असतानाही बोगस बिलांच्या माध्यमातून पैसे उचलले गेले होते, हा गंभीर गुन्हा आहे असंही धस यावेळी म्हणाले. त्यामुळे धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना परळी आंबेजोगाई भागात तब्बल 73 कोटी 36 लाखांची बोगस बिले दाखवून रक्कम लाटण्यात आली. शिवाय त्यातून एक रुपयाचेही काम केले गेले नाही आसा धस यांचा आरोप आहे.