जाहिरात

Tiger Urine: बाटलीत विकली जात होती वाघाची लघवी, किंमत 600 रुपये, हैराण करणारं सत्य आलं समोर अन्...

या प्राणी संग्रालयाला एका पर्यटकाने भेट दिली. त्यानंतर ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली.

Tiger Urine: बाटलीत विकली जात होती वाघाची लघवी, किंमत 600 रुपये, हैराण करणारं सत्य आलं समोर अन्...

वाघाची लघवी औषध म्हणून काम करत असेल तर? तुम्ही ही विचारात पडलात ना? पण असं होवू शकतं, असा दावा चीनमधल्या एका प्राणी संग्रालयानं केला आहे. दक्षिण- पश्चिम चीनच्या  सिचुआन प्रांताच्या यान बिफेंगक्सिया या प्राणीसंग्रालयात वाघाची लघवी विकण्याचा प्रकार समोर आला आहे. वाघाच्या लघवीमुळे अनेक आजारांवर उपचार होवू शकतो. वाघाच्या लघवीमध्ये जर व्हाईट वाईन मिळवली तर अनेक आजारांवर ते एक औषध म्हणून काम करतं असा दावा ही या प्राणी संग्रहालयाने केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्राणी संग्रालयाला एका पर्यटकाने भेट दिली. त्यानंतर ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली. असं साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टनुसानं म्हटलं आहे. या संग्रालयात सायबेरियन वाघांची लघवी 250 च्या बाटलीतून विकले जात होते. त्याची किंमत 50 युवान म्हणजेच भारताचे 600 रुपयांत विकली जात होती. 

ट्रेंडिंग बातमी - Shri Krishna TV Series : श्रीकृष्ण मंदिरात मराठी अभिनेत्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी, करावे लागले एअरलिफ्ट

वाघाची ही लघवी वेगवेगळ्या आजारांवर वापरली जावू शकते. त्यात चमक, मासपेशींमध्ये ताण,अंग दुखी या सारख्या अजारांवर त्याचा उपयोग होवू शकतो. या बाटलीवर काही सुचनाही लिहीण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही लघवी वापरण्या आधी ती व्हाईट वाईनमध्ये मिक्स करावी. त्यानंतरच तिचा वापार केला जावा. प्राणी संग्रालयाच्या मते तुम्ही हे औषध तोंडाच्या वाटेही घेवू शकता. मात्र जर कोणती अॅलर्जी असेल तर तात्काळ या औषधाचा वापर बंद करा. 

ट्रेंडिंग बातमी - Rickshaw taxi fare hike : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचे नवे दर कधीपासून लागू होणार?

वाघ ज्या ठिकाणी लघवी करतात ती सर्व बेसीनमध्ये एकत्र केली जाते. त्यानंतर ती बाटलीत भरली जाते असं इथं काम करणारे कर्मचारी सांगता. मात्र ती लघवी जंतूविरहीत केली जाते की नाही याबाबत मात्र त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र यावर आता चीनमधूनच टीका होत आहे. कोणत्याही पुराव्या शिवाय वाघाची लघवी औषध आहे हे सांगणे चीनसाठी चांगली गोष्ट नाही. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही ते घातक आहे असंही टीकाकार आता म्हणत आहेत. वाघाची लघवी ही पारंपारीक औषध नाही असं ही सांगितलं जात आहे. शिवाय ही लघवी विकण्यासाठी योग्य आहे का? त्याचे परमिट प्राणीसंग्रालयाकडे आहे का अशी विचारणाही काही डॉक्टर्सनी उपस्थित केला आहे.    

ट्रेंडिंग बातमी - Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा पाय खोलात! हायकोर्टात याचिका दाखल; ED चौकशीची मागणी

याबाबत चीनमध्ये सोशल माडियामध्ये जोरादर चर्चा आहे. आपण आपल्या वडीलांच्या उपचारासाठी औषध म्हणून ही लघवी खरेदी केली. पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. एक जण लिहीतो की मी माझ्या आईसाठी हे औषध घेण्याचा विचार करत आहे. त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत. त्यामुळे ते एकदा वापरून पहावे असंही एकाने म्हटलं आहे. तर लघवीत बॅक्टेरीया नसतात का? त्यामुळे त्याच्या वापराचा विचार करणेच योग्य नाही असंही काही जण म्हणत आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com